नागपूर हिवाळी अधिवेशन ( विधानपरिषद प्रश्नोत्तरे )

जात प्रमाणपत्र अभावी प्रवेश रद्द केला जाणार नाही. -दिलीप कांबळे
नागपूर, दि.22 : कोणत्याही विद्यार्थ्याचा जात प्रमाणपत्र अभावी वैद्यकीय व अभियंत्रकीसाठी प्रवेश रद्द केला जाणार नाही. असे समाजकल्याण राज्य मंत्री दिलीप कांबळे यांनी विधानपरिषदेत सांगितले.

सदस्य हेमंत टकले यांनी विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने वैद्यकीय व अभियांत्रिकीचे प्रवेश रद्द केल्या बाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. श्री.कांबळे म्हणाले जात पडताळणी अभावी कोणत्याही विद्यार्थ्यावर अन्याय झाला नसून सर्वोच्च आणि उच्च न्यायलयाच्या आदेशाने प्रवेशासाठी निवड यादी प्रसिद्ध केली आहे.

0000

पर्यावरण कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल - पर्यावरण मंत्री रामदास कदम

समुद्र किनारी सागरी नियमन क्षेत्र व पर्यावरण कायद्याचे उल्लंघन करुन बांधकाम केल्या प्रकरणी पर्यावरण कायदद्यानुसार संबंधीत अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल केल्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी विधानपरिषदेत सांगितले.

सदस्य किरण पावसकर यांनी मुरुड-जंजिरा, बोरली, बार्शी व नांदगांव (जि.रायगड) येथील समुद्र किनाऱ्यावर पर्यावरण कायद्याचे उल्लंघन करुन काही अधिकाऱ्यांनी बांधाकाम व्यावसायिकांच्या संगनमताने
आलिशान बंगले बांधल्या प्रकरणी प्रश्न उपस्थित केला होत. त्यावर उत्तर देताना श्री. कदम पुढे म्हणाले अलिबाग व मुरुड तालुक्यातील समुद्रकिनारी बांधण्यात आलेल्या अनुक्रमे 145 व 167 बांधकाम धारकांना तहसीलदारांकडून नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. तसेच अलिबाग तालुकयातील 61 व मुरुड तालुक्यातील 101 दाव्यामध्ये अनाधिकृत बांधकामाबाबत न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली आहे. लवकरच ही सर्व प्रकरणे केंद्रीय हरीत लवादाकडे वर्ग झाल्यावर पुढील दोन तीन महिन्यात या संदर्भात निर्णय येईल.

यावेळी झालेल्या चर्चेत पर्यावरण राज्य मंत्री प्रवीण पोटे-पाटील, सदस्य सर्वश्री जयंत पाटील, भाई जगताप यांनी भाग घेतला.

0000

शुद्ध पाण्याच्या बाबतीत केंद्र सरकारचे जानेवारी महिन्यात नवे धोरण - गिरीष बापट


येत्या जानेवारी महिन्यात केंद्र सरकार शुद्ध पाण्याच्या बाबतीत धोरण जाहिर करणार असल्याने राज्यातील सर्व नागरिकांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येईल. असे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी विधानपरिषदेत सांगितले.

सदस्य प्रकाश गजभिये यांनी नागपूर शहरात मिनरल वॉटरच्या नावाखाली पाण्याची विक्री होत असल्याबाबतचा प्रश्न विचारला होता. बापट पुढे म्हणाले नागपूर जिल्ह्यात बंद बॉटलमध्ये पाणी
पुरवठा करणारे 82 उत्पादक आहेत. ज्या कंपन्यांनी दूषित पाण्याचा पूरवठा केला त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. केंद्र सरकारचे पाणी पुरवठ्याबाबत नव्याने धोरण येत असल्याने भविष्यात सर्वच नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा होईल.

0000

येवला तालुक्यातील चिंचोडी औद्योगिक वसाहतींना पायाभूत सुविधांच्या कामास प्रशासकीय मंजूरी -उद्योग राज्य मंत्री प्रवीण पोटे पाटील

चिंचोडी (ता.येवला जि.नाशिक) येथील नवीन औद्योगिक वसाहतींना पायाभूत सुविधांच्या कामाच्या प्रशासकीय प्रस्तावास मंजुरी देण्यात आल्याचे उद्योग राज्य मंत्री प्रवीण पोटे-पाटील यांनी
विधानपरिषदेत सांगितले. 

सदस्य जयंतराव जाधव यांनी औद्योगिक वसाहतीला पायाभूत सूविधा देण्याबाबतचा प्रश्न विचारला होता. पाटील म्हणाले महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या नाशिक विभागीय कार्यालयाने
मुख्यालयास प्रस्ताव दिला असून त्यात रस्ते, जलवितरिता, पथदिवे, विद्युत उपकेंद्र आदी पायाभूत सुविधांचा समावेश आहे.
००००

कोळशाचा साठा उपलब्ध असल्याने भारनियमन नाही - उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

वीज निर्मिती केंद्रांना आवश्यक कोळशाचा साठा उपलब्ध असल्याने राज्यात भारनियमन होणार नाही. असे उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानपरिषदेत सांगितले.

सदस्य आनंदराव पाटील यांनी राज्यातील भारनियमनाचा प्रश्न उपस्थित केला. श्री.बावनकुळे म्हणाले भविष्यात विजेचा प्रश्न सोडविण्यासाठी सोलर ऊर्जा तसेच पवन ऊर्जेचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात
येणार असून राज्यातील 40 हजार शेतकऱ्यांना सौर ऊर्जा देण्याबाबत कार्यवाही करणार आहोत. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री धनंजय मुंडे, शरद रणपिसे, भाई जगताप, जयंत पाटील, भाई गिरकर निलम गोऱ्हे यांनी सहभाग घेतला. 
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget