नागपूर हिवाळी अधिवेशन ( विधानसभा लक्षवेधी )

मुंबई विद्यापीठ ऑनस्क्रीन मार्किंग पद्धतीच्या कार्यवाहीत 

ज्यांच्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले त्यांच्यावर कठोर कारवाई करणार - उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे

नागपूर, दि. 14 : मुंबई विद्यापीठाच्या ऑनस्क्रीन मार्किंग पद्धतीची चौकशी करण्यासाठी त्रिस्तरीय सदस्य समिती नेमण्यात आली असून त्यामार्फत या प्रक्रियेचा अभ्यास केला जात आहे. ज्यांच्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले त्या प्रत्येकावर कारवाई केली जाईल, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज विधानसभेत सांगितले.

यासंदर्भात सदस्य अतुल भातखळकर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. याला उत्तर देताना तावडे बोलत होते. यावेळी झालेल्या चर्चेत उपप्रश्नाला उत्तर देताना राज्यमंत्री रविंद्र वायकर म्हणाले की, या त्रिस्तरीय सदस्य समितीमार्फत करार निविदा प्रक्रिया यांचा अभ्यास केला जात आहे. या समितीसाठी तीन महिन्याची मुदत देण्यात आली असून, अहवाल प्राप्त होताच कार्यवाही करण्यात येईल. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य अजित पवार यांनी भाग घेतला. 
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget