नागपूर हिवाळी अधिवेशन ( विधानपरिषद लक्षवेधी )

वाळूच्या महसुलाचा वाटा गावाला: नवीन वाळू धोरणात तरतूद करू - महसूलमंत्री चंद्रकांत पाटील

नागपूर, दि. 22 : वाळूच्या ठेक्यातून मिळणाऱ्या महसुलाचा वाटा त्या गावाला देणे, गावाने मान्यता दिल्याशिवाय वाळू काढण्याचे ठेके दिले जाणार नाहीत आदी तरतुदी नवीन वाळू धोरणामध्ये करण्यात येणार आहेत, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत दिली.

जालना जिल्ह्यात अंबड आणि घनसावंगी या तालुक्यांमध्ये तहसीलदार आणि ठेकेदारांनी संगनमताने वाळूमध्ये केलेल्या अपहारप्रकरणात सदस्य विनायक मेटे यांनी मांडलेल्या सुचनेला उत्तर देताना ते बोलत होते. पाटील यांनी यावेळी माहिती दिली की, या अपहार प्रकरणामध्ये विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी सुरू आहे. यात दोषी आढळणाऱ्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल. ते पुढे म्हणाले की, वाळूचोरी प्रकरणात कारवाई करण्यास गेलेल्या महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांवर हल्ले होण्याच्या घटना राज्यात घडत आहेत. त्यामुळे वाळूचोरी विरोधात कारवाईप्रसंगी संरक्षणासाठी शासकीय निधीतून खासगी सुरक्षारक्षक घेता येईल अशी तरतूद नवीन वाळू धोरणामध्ये करण्यात येईल, असेही पाटील म्हणाले. लक्षवेधी सूचनेवरील चर्चेत सदस्य अमरसिंह पंडित यांनीही सहभाग घेतला.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget