नागपूर हिवाळी अधिवेशन ( विधानपरिषद प्रश्नोत्तरे )

मुस्लिम समाजाला शैक्षणिक संस्थेत 5 टक्के आरक्षण कायम- विनोद तावडे

नागपूर, दि. 14 : मुस्लिम समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक सोयी सुविधा देण्यामध्ये शासकीय व अनुदानित शैक्षणिक संस्थेमध्ये 5 टक्के आरक्षण कायम ठेवण्यात आल्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विधानपरिषदेत सांगितले.

मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याबाबतचा प्रश्न सदस्य संजय दत्त यांनी विचारला होता. तावडे पुढे म्हणाले मुस्लिम समाजाला खाजगी विनाअनुदानित संस्थांमध्ये प्रवेश व शासकीय सेवेतील भरतीसाठी दिलेल्या आरक्षणाला उच्च न्यायालायाने स्थगिती दिली आहे. सदर अद्यादेशाचे 23 डिसेंबर 2014 पर्यंत कायद्यात रुपांतर न झाल्याने सदर अध्यादेश व्यपगत झाला. हे प्रकरण उच्च न्यायालयात अंतीम निर्णयासाठी प्रलंबित आहे. या चर्चेत सदस्य सर्वश्री शरद रणपिसे, भाई जगताप, विक्रम काळे हुस्नबानू खलिफे यांनी भाग घेतला.
००००
अनुदानास पात्र शाळांना 20 टक्के अनुदानाचे वितरण- विनोद तावडे

राज्यातील कायम विनाअनुदानावरुन अनुदानास पात्र शाळांना सरसकट 20 टक्के अनुदान वितरित केल्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विधानपरिषदेत सांगितले.

सदस्य डॉ.सुधीर तांबे यांनी शाळांच्या अनुदानाबातचा प्रश्न विचारला होता. तावडे म्हणाले दि. 1 व 2 जुलै 2016 च्या शासन निर्णयामुळे अनुदानास पात्र घोषित केलेल्या शाळांना अनुदान मंजूर करण्याच्या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही सुरु आहे. या चर्चेत सदस्य सर्वश्री विक्रम काळे, श्रीकांत देशपांडे, नागोराव गाणार यांनी सहभाग घेतला.
००००

शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना आरोग्य कुटुंब योजना लागू करण्याची कार्यवाही सुरु- विनोद तावडे

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना कॅशलेश कार्डाची सावित्रीबाई फुले – फातिमा शेख आरोग्य कुटुंब योजना लागू करण्याची कार्यवाही शासन स्तरावर सुरु असल्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सांगितले. सदस्य कपिल पाटील यांनी शिक्षक आणि शिक्षकेत्तरांना आरोग्य कुटुंब योजना लागू करण्याबाबतचा प्रश्न विचारला होता. तावडे म्हणाले महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेप्रमाणे कॅशलेश कार्डाची सुविधा लागू करण्याबाबत शासनाची भूमिका सकारात्मक आहे. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री श्रीकांत देशपांडे, जयवंतराव जाधव यांनी सहभाग घेतला.
००००
अपंग समावेशित शिक्षण योजनेअंतर्गत 840 शिक्षकांचे थकित वेतन अदा- विनोद तावडे

अपंग समावेशित शिक्षण योजनेअंतर्गत कार्यरत असणाऱ्या 840 शिक्षकांचे थकित वेतन अदा करण्यात आल्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.

सदस्य प्रा.अनिल सोले यांनी अपंग समावेशित योजनेअंतर्गत कार्यरत असणाऱ्या विशेष शिक्षक व परिचरांच्या थकीत वेतनाबाबतचा प्रश्न विधानपरिषदेत उपस्थित केला होता. तावडे म्हणाले अपंग समावेशित शिक्षण योजना ही केंद्र शासनाची योजना असून 4 ते 5 वर्षा पासूनचे वेतन दिलेले नव्हते. या योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या 1185 विशेष शिक्षक व 72 परिचरांच्या समाप्त करण्यात आलेल्या सेवा पुर्न:प्रस्थापित केल्या आहेत. 
००००
येवला तालुक्यातील 41 टंचाईग्रस्त गावांसाठी नवीन प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सुरु करणार- बबनराव लोणीकर

येवला तालुक्यातील 41 टंचाईग्रस्त गावांसाठी मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमामध्ये नवीन प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सुरु करणार असल्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी विधानपरिषदेत सांगितले.

सदस्य जयवंतराव जाधव यांनी पाणीपुरवठ्याबाबतचा प्रश्न विचारला होता. लोणीकर म्हणाले नवीन प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळाने अहवाल सादर केला आहे. या अहवालाची छाननी करण्याची कार्यवाही सुरु आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget