नागपूर हिवाळी अधिवेशन ( विधानसभा प्रश्नोत्तरे )

कुष्ठरुग्णांची सेवा करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या अनुदानात वाढ करण्याबाबत सकारात्मक निर्णय - आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत

नागपूर, दि. 14 : राज्यात कुष्ठरोग शोध मोहीम 2 वर्षापासून सुरु असून त्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यात 252 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यांच्यावर औषधोपचार करुन त्यांना रोगमुक्त करण्यात आले आहे. कुष्ठरुग्णांची सेवा करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या अनुदानात वाढ करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ, असे आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी आज येथे विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

राज्यात राबविण्यात आलेल्या कुष्ठरोग शोधमोहिमेबाबत सदस्य प्रशांत ठाकूर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना आरोग्यमंत्री बोलत होते.

राज्यातील 22 जिल्ह्यात 6 ते 21 सप्टेंबर 2017 दरम्यान कुष्ठरोग शोधमोहीम राबविण्यात आली. या मोहिमे अंतर्गत रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात 659 संशयित रुग्णांची नोंदणी झाली. त्यांची तपासणी केली असता 66 जणांना कुष्ठरोग झाल्याचे आढळून आले. त्यांच्यावर उपचार करण्यात आले.

राज्यात ग्रामीण व उप जिल्हा रुग्णालय स्तरावर 219 कुष्ठरोग संदर्भ सेवा केंद्र आहे. त्यापैकी ठाणे जिल्ह्यात 15, रायगड 15, पालघर 12 अशी संदर्भ सेवा केंद्र आहेत.

राज्यात कुष्ठरुग्णांच्या सेवा करणाऱ्या 29 स्वयंसेवी संस्था काम करत असून त्यांच्या अनुदानात वाढ करण्याबात सकारात्मक निर्णय घेऊ. वर्धा जिल्ह्यात कुष्ठरोग शोध मोहिमेबरोबरच हत्ती पाय रोग शोध मोहिम हाती घेऊ, असेही आरोग्य मंत्र्यांनी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री सुनिल केदार, समीर कुणावार, संजय केळकर, मिलिंद माने यांनी भाग घेतला.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget