नागपूर हिवाळी अधिवेशन ( विधानपरिषद इतर कामकाज )

ओखीमुळे बाधित शेतकरी व मच्छीमारांसाठी मदतीची - चंद्रकात पाटील यांच्याकडून घोषणा

नागपूर, दि. 20 : ओखी वादळामुळे बाधित झालेल्या पिकांसाठी तसेच मच्छीमारांसाठी मदतीची घोषणा मदत व पुनर्वसनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत आज केली.

सदस्य सुनिल तटकरे यांनी उपस्थित केलेल्या नियम 97 वरील चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. मंत्री पाटील पुढे म्हणाले की, दि. 4 डिसेंबर 2017 रोजी झालेल्या ओखी वादळामुळे कोकणातील कडधान्ये, भाजीपाला, आंबा, काजू पिकासह नाशिक जिल्ह्यातील द्राक्षबागांचे नुकसान झाले आहे. कडधान्य पिकाचे सुमारे 300 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. तसेच रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्ह्यातील मच्छीमारांच्या बोटी आणि मच्छीमारी जाळ्यांचे नुकसान झाले आहे. घरांचेही नुकसान झाले आहे. या सर्व बाबींचे पंचनामे करण्याचे आदेश तात्काळ 7 डिसेंबर रोजी शासनाने दिले आहेत. पंचनामे योग्यरित्या व्हाव्यात यासाठी संबंधित यंत्रणेला आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. पंचनाम्यांबाबत कोठे काही तक्रारी असल्यास संबंधित जिल्हाधिकारी व प्रांताधिकाऱ्यांना कडक सूचना दिल्या जातील असेही ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, ओखी वादळामुळे अंशत: नुकसान झालेल्या बोटींच्या दुरुस्तीसाठी प्रत्येकी 4 हजार 100 रुपये, पूर्णत: नष्ट झालेल्या बोटींसाठी 9 हजार 600 रुपये, अंशत: नुकसान झालेल्या मासेमारी
जाळ्यांसाठी 2 हजार 100 रुपये तर पूर्णत: नष्ट झालेल्या जाळ्यांसाठी 2 हजार 600 रुपये मदत देण्यात येईल. नुकसानग्रस्त कोरडवाहू क्षेत्रासाठी प्रतिहेक्टरी 6 हजार 800 रुपये, बागायती पिकांसाठी प्रतिहेक्टरी 13 हजार
500 रुपये तर बहुवार्षिक फळपिकांसाठी प्रतिहेक्टरी 18 हजार रुपये मदत देण्यात येईल. घोषित केलेली नुकसान भरपाईची मदत केंद्र शासनाकडून राष्ट्रीय आपत्ती मदत निधीतून (एनडीआरएफ) निधी येईपर्यंत वाट न पाहता राज्य शासनाच्या निधीतून ही मदत तात्काळ देण्यात येणार आहे.

तत्पूर्वी पाटील यांनी माहिती दिली की, ओखी वादळाबाबत दि. 3 व 4 डिसेंबर रोजी समुद्रकिनाऱ्यावर धोक्याचा इशारा (अलर्ट) देण्यात आला होता. तरीही समुद्रात गेलेल्या सर्व 2 हजार 606 बोटींना योग्यरित्या
संदेशयंत्रणा राबवून कोणतीही जीवितहानी न होता समुद्रकिनाऱ्यावर आणण्यात आले. केरळ, तामिळनाडू, गोवा तसेच कर्नाटक राज्यातील 389 बोटी भरकटून आपल्या समुद्रकिनाऱ्यावर आल्या होत्या. त्यावरील 2 हजार 885 खलाश्यांची निवासाची, जेवण- खाण्याची व परत जाण्यासाठी बोटींना डिझेल देण्याची अशी
सर्व व्यवस्था राज्य शासनाने केली. त्यासाठी 2 कोटी रुपयांची विशेष तरतूद करण्यात आली.

या चर्चेत सदस्य सर्वश्री भाई गिरकर, जयंत पाटील, हुस्नबानू खलिफे यांनी सहभाग घेतला.
000

वातावरण बदलाच्या अनुषंगाने उपाययोजनांबाबत विधिमंडळ सदस्यांची समिती स्थापन करणार
- पर्यावरणमंत्री रामदास कदम

जागतिक तापमान वाढ तसेच वातावरण बदलाच्या अनुषंगाने उपाययोजनांबाबत विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाच्या सदस्यांची समिती स्थापन करण्यात येईल, असे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी विधानपरिषदेत सांगितले.

सदस्य हेमंत टकले यांनी नियम 97 अन्वये उपस्थित केलेल्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. श्री. कदम म्हणाले की, हा खूप मोठा विषय असून त्यावर व्यापक चर्चा होण्याची गरज आहे. त्या अनुषंगाने विधिमंडळ सदस्यांची समिती स्थापन करण्यात येईल. 

वातावरण बदलाच्या अनुषंगाने उपाययोजना बाबत बोलताना आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत म्हणाले की, पर्यावरण बदलामुळे समुद्राच्या पाणीपातळीत वाढ होण्याचा धोका अभ्यासकांकडून वर्तविण्यात येत आहे.
प्रदुषणामुळे स्वाईन फ्लूच्या विषाणूंची तसेच डेंग्यूच्या डासाची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे स्वाईन फ्लू वरील लसीवर दरवर्षी संशोधन करुन आंतरराष्ट्रीय बाजारातून मागवावी लागते. सध्या होत असलेल्या प्रदुषणावर उपाययोजना करण्याची गरज असून कार्बन क्रेडीटचे व्यवस्थापन करण्याची गरज आहे. घर अथवा इतर ठिकाणातून बाहेर पडताना रेफ्रिजरेटर, ए.सी. बंद करुन बाहेर पडणे गरजेचे आहे. यामुळे तापमानवाढीवर नियंत्रण आणता येणे शक्य आहे.

पर्यावरण राज्यमंत्री प्रविण पोटे- पाटील म्हणाले की, हरीतगृह वायूंमुळे वातावरणातील उष्णता रोखून ठेवली जाते. मोठ्या शहरात प्रदूषणही वाढत आहे. त्यादृष्टीने मोठ्या शहरातील घनकचरा व्यवस्थापन तसेच
बायोमेडिकल वेस्टचे व्यवस्थापन करण्यासाठी निधी राखून ठेवण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.

या चर्चेत सदस्य जयंत पाटील, डॉ. निलम गोऱ्हे, हुस्नबानू खलिफे, विद्या चव्हाण यांनी सहभाग घेतला.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget