भीमा कोरेगाव घटनेचे महाराष्ट्र राज्यात उमटले पडसाद

मुंबई ( जानेवारी २ ) : पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथे शौर्य दिनानिमित्त सोमवारी देशभरातून लाखो आंबेडकरी अनुयायी आले होते. पण समाजकंटकाकडून आंबेडकरी अनुयायांवर दगडफेक केली गेली. अनेक गाड्यांची तोडफोड करीत जाळपोळ ही करण्यात आली. या घटनेचे तीव्र पडसाद मंगळवारी सकाळ पासून महाराष्ट्र राज्यात उमटले आहेत.

मुंबईतील मुलुंड परिसरात बसची तोडफोड करण्यात आली आहे. आंदोलकांनी चेंबूर ते गोवंडी दरम्यान हार्बर मार्गावरील ट्रॅक अडवल्यामुळे तासाभरापासून रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. चेंबर येथे कड़कड़ित बंद पुकारण्यात आला असून गोवंडी आणि कल्याण भागातही पडसाद उमटले आहेत. चेंबूर ते सायनपर्यंत ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे.

इचलकरंजी, कागल, हुपरी आणि पट्टणकोडोली या गावामध्ये काही युवकांनी चौकात टायरी जाळून रास्ता रोको करण्यात आले. दरम्यान, सर्व ठिकाणची परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

दरम्यान, जिल्ह्यातील इचलकरंजी, पट्टणकोडोली, हुपरी आणि कागल परिसरातही या घटनेचे पडसाद उमटले. मराठवाड्यातही घटनेचे पडसाद उमटले आहेत.

भीमा कोरेगाव प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 
भीमा कोरेगाव घटनेची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली आहे. भीमा कोरेगाव प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीचे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत.

यावर्षी 200 वर्ष झाल्याने या ठिकाणी 2 लाखपेक्षा जास्त लोक आले होते. त्यामुळे येथे मोठ्याप्रमाणावर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. पोलिसांनी सर्व परिस्थिती नियंत्रणात आणली. पण एक मृत्यू झाला आहे. ज्या मुलाची हत्या झाली आहे, त्यांच्या कुटुंबाला 10 लाखाची मदत केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
 
हिंसक प्रवृत्तींचा हात असल्याची शंका - शरद पवार 
भीमाकोरेगाव येथे घडलेल्या घटनेला कुठलाच रंग देऊ नका, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही केले आहे. दगडफेकीमागे हिंसक प्रवृत्तींचा हात असल्याची शंका ही त्यांनी व्यक्त केली आहे. 

सखोल चौकशी करा : रामदास आठवले
हा हल्ला काही लोकांनी जाणीवपूर्वक केलेला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. ज्या लोकांनी हिंसा भडकावली, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सरकारकडे आहे. तसंच दोषी पोलिस अधिकाऱ्यांवर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करण्याची मागणी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget