सर्व २४ विभागांमध्ये दिवसभरात ३१४ ठिकाणी महापालिकेची कारवाई

मुंबई, दि. 30 : बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील उपाहरगृहे, हॉटेल्स इत्यादींमधील अनधिकृत / बेकायदेशीर बाबींची तपासणी करण्याचे व त्यानुसार कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त श्री. अजोय मेहता यांनी सर्व २४ विभागांच्या सहाय्यक आयुक्तांना काल दिले होते. त्यानुसार आज महापालिकेच्या सर्व विभागांमध्ये विशेष चमूंचे गठन करुन त्याद्वारे उपहारगृह, हॉटेल्स, मॉल्स इत्यादींमध्ये मोहिमस्वरुपात तपासणी करण्यात आली आहे. या तपासणी दरम्यान आढळून येणारी अनधिकृत वा वाढीव बांधकामे तात्काळ तोडण्यात आली आहेत.

आजच्या कारवाई दरम्यान तपासणी करण्यात आलेल्या ६२४ ठिकाणांपैकी अनियमितता / अनधिकृत बांधकामे आढळून आलेल्या ३१४ ठिकाणी तोडकाम कारवाई करण्यात आली आहे. तर ७ उपहारगृहे सील करण्यात आली आहेत. त्याचबरोबर ४१७ पेक्षा अधिक सिलिंडर देखील आजच्या कारवाई दरम्यान जप्त करण्यात आले आहेत.

या कारवाईसाठी सर्व २४ विभागांमध्ये प्रत्येकी ३ चमू तयार करण्यात आल्या आहेत. यात विविध संबंधित खात्यातील कामगार-कर्मचारी-अधिकारी यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त संबंधित सहाय्यक आयुक्त,उपायुक्त व अतिरिक्त महापालिका आयुक्त घटनास्थळी उपस्थित राहून पर्यवेक्षकीय काम करित आहेत.तसेच अग्निशमन दलाचे अधिकारी व कर्मचारी कार्यरत होते. याप्रमाणे एकूण महापालिकेचे सुमारे १ हजार कामगार-कर्मचारी-अधिकारी या कामी आज कार्यरत होते.

विशेष म्हणजे पालिकेच्या इतिहासात प्रथमच तिन्ही अतिरिक्त आयुक्त तोडक कारवाई सुरु असलेल्या ठिकाणी स्वत: उपस्थित होते. यामध्ये अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) आय. ए. कुंदन,अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) विजय सिंघल, अतिरिक्त आयुक्त (शहर) आबासाहेब ज-हाड यांचा समावेश आहे.

याशिवाय, महापालिकेद्वारे सर्व संबंधित उपाहरगृहे, हॉटेल्स, मॉल्स यांना सूचित करण्यात येत आहे की,त्यांनी आपल्या स्तरावर अग्निसुरक्षेसह सर्व बाबींची तपासणी करावी व नियमांनुसार आवश्यक त्या सुधारणा तातडीने करवून घ्यावात. अन्यथा, ज्या ठिकाणी नियमबाह्य व बेकायदेशीर बाबी आढळून येतील,त्या तात्काळ तोडण्यात येतील.

वरील तपशीलानुसार आज सकाळपासून महापालिकेच्या सर्व विभागांमध्ये सुरु करण्यात आलेल्या कारवाईचा विभागनिहाय व परिमंडळनिहाय संक्षिप्त तपशिल पुढीलप्रमाणे आहे:

परि.
विभाग
तपासणी संख्या
कारवाई संख्या
सिलिंडर जप्त
उपहारगृहे हॉटेल पैकी महत्त्वाची नावेएक
3
3
6
काळा घोडा जवळील खैबर हॉटेल,
दादाभाई नौरोजी मार्गावरील जाफरान हॉटेल,
मर्जबान मार्गावरील बरिस्ता हॉटेल

बी
41
2
0
दोन उपहारगृहांवर कारवाई

सी
7
7
15
कॅथॉलिक जिमखाना, - पारशी जिमखाना
विल्सन जिमखाना इस्लाम जिमखाना

डी
5
5
0
हॉटेल शालीमारमौशौकत अली मार्ग (हुक्का पार्लर)
नित्यानंद हॉटेलराजाराम मोहन रॉय मार्ग
से चीज हॉटेलजैन टॉवरमॅथ्थु रोड (हुक्का पार्लर)
हॉटेल रिव्हायवलगिरगाव चौपाटी

58
20
9
साहिल हॉटेल
मराठा मंदिर कॉलेजच्या गच्चीवरील अनधिकृत कँटीन व शेड तोडलेदोन


दोन
एफ /दक्षिण
39
36
39
डॉमिनो पिझ्झाडॉबाबासाहेब आंबेडकर मार्ग,
फासोस उपहारगृह, - ऍक्फा उपहारगृह
कैलास लस्सीदादर

एफ /उत्तर
17
17
27
अयप्पा इडली सेंटर
आर्यभवन, - माया स्वीट, - गुरुनानक स्वीट
केरळा हॉटेल
जी /दक्षिण
16
16
11
कमला मिल मधील लेडी बागाहक सेद फॅटीबो,डीआएचग्रँड मा कॅफेमिल्कझायकोटप्पापीओएच,कोडप्रवासस्मॅश
रघुवंशी मिल मधील अनेक अनधिकृत बांधकामे
ऍट्रीया मॉल मधील उपहारगृह इत्यादी
जी /उत्तर
32
8
0
विविध उपहारगृहेहॉटेल इत्यादींमधील अनधिकृत बाबी


तीन
एच /पूर्व
35
12
68
एमआयजी इत्यादी

एच /पश्चिम
25
14
0
जंक यार्ड, - हिल रेड
न्यूयॉर्क चॅपल रोड, - केएफसी मॉल
झेन शॉपिंग सेंटर, - यू टर्न
बॉम्बे अड्डा रेडियो बार
ओन्ली पराठा इत्यादी
के /पूर्व

71
7
0
पेनीनसुला हॉटेल, - हॉटेल ऑर्किड इंटरनॅशनल
हॉटेल बावा


चार
के /पश्चिम
37
14
52
शिशाज स्काय लाऊंजच्या गच्चीवरील ९ हजार चौरस फूटांचे अधिकृत बांधकाम तोडण्यात येऊन गच्ची सिल करण्यात आली
कुब, - क्रिस्टल पॉइंट मॉल
प्राव्होग, - टॅप रेस्टॉरंट
पी /दक्षिण
19
7
43
हॉटेल आझोन, - पिकासो
एव्हर शाईन मॉल इत्यादी
पी /उत्तर

29
11
0
रिट्रीट हॉटेलचे बेसमेंट तोडले

पाचपाच

एल

69
69
67
पेनीनसुला हॉटेल,
हॉटेल चॉईस ली (वीज व पाणीपुरवठा तोडला)
हॉटेल मेग्रुस्सा
एम /पूर्व
13
4
0
गिरीजा हॉटल, - मिडनाईट बार
सदगुरु हॉटेल, - आदित्य हॉटेल
चेंबूर 74 हॉटेल

एम /पश्चिम
23
5
0
२ उपहारगृहे सिल केली
सहा


एन

20
15
0
आरसिटी मॉल, - आरकेहॉटेल
जॉली जिमखाना, - नीलकंठ बँक्वेट
संतोष बार ऍण्ड रेस्टॉरंट इत्यादी

एस
4
4
0
जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड वरील सागर
- 38 फीस्ट, - मिनी पंजाब
सॅम्स किचन
वरील चारही उपहारगृह सील करण्यात आले

टी
4
4
0
शिल्पा, - विश्व सम्राट इत्यादीसात
आर /दक्षिण
13
13
0
पेंट हाऊसव्ही मॉल जैमिज ढाबा
सरोवर, - रामाज, -निर्वाणा
इत्यादी

Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget