आंबेडकरी अनुयायांच्या मागे वकिलांची फौज ; सत्र न्यायालयात ३४ जणांना जामीन

मुंबई ( १२ जानेवारी ) : भिमा कोरेगाव येथे आंबेडकरी अनुयायांवर झालेल्या हल्ल्याविरोधात पुकारण्यात आलेल्या बंद मध्ये सहभागी असलेल्या आंबेडकरी अनुयायांवर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांच्या मदतीला वकिलांची फौज उभी राहिली असून ते कायदेशीर लढाई लढत आहे.

गेले दोन दिवस सत्र न्यायालयात आंबेडकरी अनुयायांची भक्कमपणे बाजू मांडत त्यांना जामिनावर सोडविण्याचे काम वरिष्ठ वकील भास्कर सरवदे आणि त्यांचे सहकारी वकील राधेश्याम गायकवाड, धर्मा कांबळे, रत्नाकर डावरे, सुनील डोंगरे आणि अन्य सहकाऱ्यांनी केले आहे.

याबाबत अधिक माहिती देताना भास्कर सरवदे यांनी सांगितले की, सत्र न्यायालयात ११ जानेवारी रोजी चेंबूर पोलीस ठाण्यातील १५ जणांची जामीनांवर सुटका करण्यात आलेली आहे. तर आज १२ जानेवारी रोजी सत्र न्यायालयात गोवंडी पोलीस ठाण्यातील २३ जणांची जामीनांवर सुटका करण्यात आलेली आहे. यामध्ये उच्च शिक्षित मुलांचा समावेश सर्वाधिक आहे.

भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आम्हाला आपल्या समाजातील बांधवांना मदत करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार, आम्ही आपल्या समाज बांधवांसाठी कोणत्याही प्रकारची फी न आकारता काम करत असल्याचे सरवदे यांनी सांगितले.

अटक सत्राला घाबरून जावू नये, आपण आपली लढाई कायदेशीर मार्गाने लढू व त्यातून तुमची सुटका करू, असे आवाहन सरवदे यांनी आंबेडकरी अनुयायांना केले आहे. जर कोणाला मदत हवी असल्यास कृपया भास्कर सरवदे यांच्याशी संपर्क करू शकता. संपर्क : ९८२०६५८७२०
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget