महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेंतर्गत शौर्यपदक, सेनापदक धारकांना अनुदान मंजूर

मुंबई ( ६ जानेवारी ) : सैन्यातील शौर्यपदक, सेवापदक धारकांना महाराष्ट्र शासनातर्फे ‘महाराष्ट्र गौरव पुरस्कार’ योजनेखाली रोख शासकीय अनुदान देण्यात येते. या योजनेंतर्गत सैन्य सेवेतील उत्कृष्ट कार्याबद्दल पदक प्राप्त झालेल्या 7 पदकधारकांना शासनाकडून अनुदान मंजूर करण्यात आले आहे. याबाबतचा शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाने काढला आहे.

कर्नल अमिताभ वालावलकर (जोगेश्वरी (पश्चिम),मुंबई) यांना 26 जानेवारी 2017 रोजी युद्ध सेवा पदक प्राप्त झाले आहे. त्यांना शासनाकडून 11 लाख रुपये अनुदान मंजूर करण्यात आले आहे. मेजर ऋषिकेश अरुण बर्डे (कोथरुड, पुणे) आणि आर एफ एन काझी झुबेर पाशा हबीब (उपळाई बु., ता. माढा, जि. सोलापूर) यांना 26 जानेवारी 2017 रोजी सेना पदक प्राप्त झाले आहे. या दोघांना प्रत्येकी 5 लाख 50 हजार रुपये अनुदान मंजूर करण्यात आले आहे.

ले. जनरल राजीव वसंत कानिटकर (नवी दिल्ली) आणि ले. जनरल अविनाश लक्ष्मण चव्हाण (हडपसर, पुणे) यांना 26 जानेवारी 2017 रोजी परम विशिष्ट सेवा पदक प्राप्त झाले आहे. या दोघांना प्रत्येकी 1 लाख 2 हजार रुपये अनुदान मंजूर करण्यात आले आहे.

वालावलकर, बर्डे, काझी, कानिटकर तसेच चव्हाण यांना मंजूर झालेल्या अनुदानातील 75 टक्के रक्कम शासकीय अनुदानातून तर 25 टक्के रक्कम मुख्यमंत्री सहायता (कारगिल) निधीतून घेण्यात आलेल्या व राष्ट्रीयीकृत बँकेत गुंतविण्यात आलेल्या रकमेच्या व्याजातून अदा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एअर वाईस मार्शल सुनील जयंत नानोडकर (दिल्ली) यांना 26 जानेवारी 2013 तर मेजर जनरल मनोमोय गांगुली (पुणे) यांना 26 जानेवारी 2015 रोजी विशिष्ट सेवा पदक प्राप्त झाले आहे. या दोघांना प्रत्येकी 34 हजार रुपये अनुदान मंजूर करण्यात आले आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget