वाशी खाडी पुलाच्या दुरुस्तीचे काम 1 फेब्रुवारीपासून सुरु होणार

मुंबई ( २४ जानेवारी ) : नवी मुंबईत आयोजित निरंकारी संत समागम कार्यक्रमासाठी येणारे भाविक आणि सलग सुट्ट्या यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येणाऱ्या वाशी खाडी पुलाच्या दुरुस्तीचे काम 23 जानेवारी ऐवजी 1 फेब्रुवारी पासून करण्यात येणार आहे.

नवी मुंबईमध्ये दि. २७ ते ३० जानेवारी या कालावधीत आयोजित निरंकारी संत समागम कार्यक्रमाच्या निमित्ताने सुमारे 5 लाख भाविकांच्या उपस्थितीमुळे वाशी येथील खाडी पुलावरून वाढणारी वाहतुकीची वर्दळ विचारात घेता सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाच्या दुरुस्तीसाठी दि. 23 जानेवारीपासून एका बाजूची वाहतूक बंद ठेवण्याचा घेतलेला निर्णय थोडा पुढे ढकलण्यात यावा, अशी विनंती या कार्यक्रमाच्या आयोजकांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांना केली होती. त्यानुसार व सलग येणाऱ्या सुट्ट्या यामुळे होणारी संभाव्य कोंडी टाळण्याच्या दृष्टीने पुलाच्या दुरुस्तीचे काम एका आठवड्याने पुढे ढकलण्याच्या सूचना पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या होत्या. यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने वाशी खाडी पुलाच्या दुरुस्तीचे काम आता गुरुवार दि. 1 फेब्रुवारीपासून सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget