दुकाने व आस्‍थापनासंबंधी अधिनियमांची महापालिकेकडून अंमलबजावणी

मुंबई ( १० जानेवारी ) :बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या दुकाने व आस्‍थापना खात्‍याकडून नागरिकांना सुचित करण्‍यात येते की, महाराष्‍ट्र शासनाच्‍या अधिसुचनेनुसार महाराष्‍ट्र (दुकाने व आस्‍थापना) अधिनियम १९४८ रद्द करण्‍यात आलेला आहे. त्‍याऐवजी महाराष्‍ट्र दुकाने व आस्‍थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम, २०१७ लागू झालेला आहे. बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या सांकेतिक स्‍थळावर उपलब्‍ध असलेले नोंदणीकरण, नुतनीकरण, बदल इत्‍यादी कामकाज नवीन अधिनियमानुसार पुढीलप्रमाणे बदल करण्‍यात येत आहेत.

१ ते ९ कामगार संख्‍या असलेल्‍या आस्‍थापनांना नोंदणीकरण, नुतनीकरण, बदल इत्‍यादीबाबत ऑनलाईन अर्ज स्‍वीकारणे बंद करण्‍यात आलेले आहे. १० व त्‍यापेक्षा जास्‍त कामगार संख्‍या असलेल्‍या आस्‍थापनांना नोंदणीकरण, नुतनीकरण, बदल इत्‍यादीबाबत ऑनलाईन सेवा सुरु राहील. महाराष्‍ट्र दुकाने व आस्‍थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम, २०१७ अन्‍वये दुकाने व आस्‍थापना खात्‍यात कार्यरत असलेल्‍या कर्मचाऱयांच्‍या पदाचे संबोधन ‘निरीक्षक’ ऐवजी ‘सुलभक’ असे करण्‍यात आले आहे.

महाराष्‍ट्र दुकाने व आस्‍थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम, २०१७ अन्‍वये महाराष्‍ट्र शासनाने खालील आस्‍थापनांबाबतीत उघडण्‍याच्‍या व बंद करण्‍याच्‍यावेळा पुढीलप्रमाणे निश्चित केलेल्‍या आहेतः-

अ. क्र.
आस्‍थापना
उघडण्‍याची वेळ
बंद करण्‍याची वेळ
१.
बियर बारपरमिट रुमहुक्‍का पार्लरडिस्‍को थेक जेथे मद्य पुरविण्‍यात येते
सकाळी ११.३० वाजता
मध्‍यरात्री १.३० वाजता
२.
दारु व सर्व प्रकारची मद्याची दुकाने
सकाळी ११.३० वाजता
रात्रौ ११.३० वाजता
३.
चित्रपटसिनेमागृह इत्‍यादी
--
मध्‍यरात्री १.०० वाजता
(दुसऱया दिवशी)

Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget