भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ उद्या महाराष्ट्र बंद - प्रकाश आंबेडकर

मुंबई : भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.

मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी जाहिर केले आहे.

बंदची हाक महाराष्ट्र लोकशाही आघाडी, महाराष्ट्र डावी आघाडी, डावी लोकशाही आघाडी, जातीमुक्त आंदोलन परिषद, एल्गार परिषदेसाठीच्या २५० संघटना मिळून जे फ्रंट तयार झाले होते त्यांनी दिली आहे. हे आव्हान आम्ही कोणाला देत नाही, त्यामुळे प्रति आव्हान कुणी देऊ नये, असे त्यांनी म्हटले.

शांततेत उद्या महाराष्ट्र बंद पाळावा तसेच सर्वसामान्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होईल, असे काही करु नका, असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.

दरम्यान, राज्यभरात उमटत असलेल्या हिंसक पडसादावर लोक आंदोलन करत असतील तर ते थांबवावे. तसेच मुख्यमंत्र्यांनी शोध मोहीम थांबवावी अन्यथा स्थिती हाताबाहेर जाईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

स्तंभाकडे येताना लागणार्‍या गावातील घरांच्या गच्चीवर दगड ठेवलेले होते. तिथून दगडफेक करण्यात आली. शिवराज प्रतिष्ठान आणि हिंदु एकता आघाडी यांनी स्वतच्या कार्यकर्त्यांना दगडफेक करायला लावली आणि गाड्या जाळल्या,असा आरोप त्यांनी केला आहे. कोरेगाव पासून शिरुर आणि कोरेगाव आणि चाकणपर्यंच्या गावाचे अनुदान बंद करण्याची मागणी त्यांनी केली.

घटनेचे सूत्रधार आहेत संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे आणि तिसरे सूत्रधार मांजरीतील घुगे आहेत, यांचा सरकारने बंदोबस्त करावा, असे त्यांनी सांगितले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget