(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांनी कृषी यांत्रिकीकरणासाठी अर्ज करावेत | मराठी १ नंबर बातम्या
" />

अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांनी कृषी यांत्रिकीकरणासाठी अर्ज करावेत

मुंबई ( २० जानेवारी ) : उन्नत शेती - समृद्ध शेतकरी मोहिमेअंतर्गत यांत्रिकीकरणाचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या शेतकऱ्यांनी अर्ज करावेत, यासाठी विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे.

शासनाने यावर्षी खरीप हंगामापासून राज्यात ‘उन्नत शेती - समृद्ध शेतकरी’ ही मोहीम विशेष राबवली आहे. त्या अंतर्गत कृषी यांत्रिकीकरणास मोठ्या प्रमाणात चालना देण्यात येत आहे. त्याकरिता शासनस्तरावरून पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

कृषी यंत्रे, अवजारे, उपकरणांच्या अनुदानासाठी नजिकच्या मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अथवा कृषी सहाय्यकामार्फत विहीत नमुन्यातील अर्ज सादर करावा. पूर्वसंमती मिळाल्यानंतर औजारे खरेदी करून अनुदानासाठी प्रस्ताव सादर करावा. त्यानंतर अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येईल. कृषी यांत्रिकीकरण योजनांची अंमलबजावणी करताना असे निदर्शनास
आले आहे, राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या शेतकऱ्यांचे अर्ज पुरेशा प्रमाणात प्राप्त झालेले नाहीत. जिल्ह्यांकडे प्राप्त अर्जांना पूर्व संमती दिल्यानंतरही लाभार्थी
औजारे खरेदी करून अनुदानासाठी प्रस्ताव सादर करीत नाहीत. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गाकरिता शासनाने उपलब्ध करून दिलेला निधी खर्च व्हावा यासाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज करावेत, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget