भीमा कोरेगाव प्रकरण : तपासात कुणाचीही गय करणार नाही - मुख्यमंत्री

मुंबई ( ४ जानेवारी ) : डॉ. राजेंद्र गवई यांनी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन भीमा-कोरेगाव घटनेला जबाबदार असणाऱ्यांना त्वरित अटक करण्याची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी याबाबत तपास सुरू असून कुणाचीही गय केली जाणार नसल्याचे सांगितले.

डॉ. गवई यांनी भीमा-कोरेगाव घटनेची न्यायालयीन चौकशी आणि या प्रकरणात भीम सैनिकांवर लावण्यात आलेले गुन्हे मागे घेऊन त्यांना मुक्त करण्याची मागणीही केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना आश्वस्त केले की, राज्य सरकार या प्रकरणाचा न्यायालयीन तपास करणार आहे. कुठल्याही प्रकारचा हिंसाचार खपवून घेतला जाणार नाही, तसेच समाजातील वातावरण दूषित करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी आनंद खरात, साताराचे हेमंत भोसले, मुंबईचे खजिनदार धनंजय थोरात, गौतम गोसावी आदी उपस्थित होते.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget