राज्य शासनाच्या ओव्हरसिज प्लेसमेंट सेंटरला विदेश मंत्रालयाची तत्वत: मंजुरी

मुंबई ( १० जानेवारी ) : भारताबाहेर रोजगाराकरिता जाणाऱ्या कामगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी परदेशात ओव्हरसीज प्लेसमेंट सेंटर कार्यान्वित करण्यास विदेश मंत्रालयाने तत्वत: मंजुरी दिली आहे.

नवी दिल्ली येथे केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील-‍निलंगेकर यांनी भेट घेतली. या भेटीदरम्यान पाटील-निलंगेकर यांनी राज्य शासनामार्फत परदेशात सुरु करण्यात येणाऱ्या ओव्हरसीज प्लेसमेंट सेंटरचे सादरीकरण करुन प्रस्ताव दिला. केंद्रीय परराष्ट्र मंत्री स्वराज यांनी या प्रस्तावाला तत्वत: मान्यता दिली आहे. या प्रस्तावाबाबतच्या सर्व बाबी पडताळून त्वरित ओव्हरसीज प्लेसमेंट सेंटर कार्यान्वित केले जाईल, अशी माहिती कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली. महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास विभागामार्फत ओव्हरसिज प्लेसमेंट सेंटर कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परदेशात लवकरच प्लेसमेंट सेंटर कार्यान्वित होईल व विदेशात रोजगार संधी मिळवण्यासाठी इच्छुक असणाऱ्या कामगार वर्गाला यामार्फत सर्व सुविधा पुरविण्यात येणार असल्याचेही पाटील-निलंगेकर यांनी सांगितले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget