अग्निसुरक्षेची व नियमांची पूर्तता पूर्तता न करणा-यांवर पुन्हा सुरु होणार महापालिकेची कारवाई

मुंबई, दि. 1 : बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात गेले २ दिवस विविध आस्थापनांच्या परिसरातील नियमबाह्य बाबींविरोधात धडक कारवाई सुरु आहे. ही कारवाई अधिकाधिक प्रभावीपणे व्हावी, यासाठी महापालिका प्रशासन कटिबद्ध असून सातत्याने प्रयत्नरत आहे. या आस्थापनांमध्ये ज्या नियमबाह्य अनियमितता आढळून आल्या आहेत, त्या दृष्टीने विभाग स्तरीय इमारत व कारखाने खात्यातील अधिकारी, सार्वजनिक आरोग्य खात्यातील अधिकारी तसेच मुंबई अग्निशमन दलातील अधिकारी इत्यादींनी आपल्या कर्तव्यात कसूर केला आहे का? व्यवसायिक तक्रारदारांबरोबर अधिकारी कर्मचा-यांचे संगनमत होते का? याबाबत सर्व ७ परिमंडळांच्या उपायुक्तांनी तपासणी करावी व अशा अधिका-यांची आणि व्यवसायिक तक्रारदारांची नावे महापालिका आयुक्तांना कळविण्याचे आदेश आज देण्यात आले आहेत.

तसेच महापालिका क्षेत्रातील आस्थापनांना ज्या अटींसापेक्ष या परवानग्या देण्यात आल्या आहेत, त्या सर्व अटींची पूर्तता त्यांच्या स्तरावर होत आहे अथवा नाही, विशेषत: अग्निशमन यंत्रणेबाबत व घ्यावयाच्या काळजीबाबत (Fire Codified Requirements) याची स्वत:हून पाहणी करावी. यानुसार त्यांच्या आस्थापनेतील जे बांधकाम किंवा ज्या बाबी अनधिकृत असतील, त्या पुढील १५ दिवसात व स्वत:हून निष्कासित कराव्यात. याचपद्धतीने अग्निसुरक्षा नियमांच्या पालनाबाबत देखील स्वत:च्या स्तरावर खात्री करवून घ्यावी.
याबाबतची माहिती महापालिकेच्या www.mcgm.gov.in (portal.mcgm.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. याबाबतचे महापालिकेद्वारे २२ डिसेंबर २०१७ रोजी वार्तापत्र काढण्यात येऊन संबंधितांना अनुषंगिक आवाहन करण्यात आले होते. (सदर वार्तापत्र संदर्भासाठी इ-मेल द्वारे पुन्हा पाठविण्यात येत आहे)

वरीलनुसार आस्थापनांनी मुदतीदरम्यान त्यांच्या परिसरातील अनियमिततांबाबत स्वत:हून कार्यवाही केली नाही, तर त्यांच्यावर मुदत संपल्यानंतर महापालिकेद्वारे पुन्हा धडक कारवाई करण्यात येईल.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget