नव्या वर्षात 11 हजार यात्रेकरुंना हज यात्रेची संधी

मुंबई ( ११ जानेवारी ) : राज्य हज समितीमार्फत प्रभावीपणे राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांसाठी समितीच्या अर्थसंकल्पीय तरतुदीमध्ये (बजेट) वाढ करणार असल्याचे आश्वासन अल्पसंख्याक राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी गुरुवारी दिले.

हज हाऊस येथे कांबळे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य हज समितीच्या हज यात्रा -२०१८ संगणकीय सोडतीद्वारे यात्रेकरुंची निवड करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.

राज्यमंत्री कांबळे पुढे म्हणाले, हज समितीमार्फत अनेक उपक्रम राबविले जातात. ही समिती प्रत्येक घटकातल्या व्यक्तीची मदत करण्यात अग्रेसर आहे. यामुळेच या समितीची अर्थसंकल्पीय तरतूद (बजेट) वाढविण्यात येणार आहे. त्याचबरोबर शासनाकडून मिळणाऱ्या सबसिडीमध्येही वाढ करण्याबाबत शासन विचाराधीन आहे. राज्यासह देशभरातून हज यात्रेला दरवर्षी हजारो यात्रेकरु जात असतात. मागील वर्षी राज्यातील 9 हजार 244 यात्रेकरुना ठराविक कोट्यातून हज यात्रेची संधी देण्यात आली होती. केंद्र व राज्य
शासनाने या कोटा 20 टक्क्यांनी वाढविला असून मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी 11 हजार 527 यात्रेकरुना हज यात्रेची संधी देण्यात आली आहे. सातत्याने तीन वर्ष अर्ज करुन चौथ्या वर्षी हज यात्रेला जाण्याची संधी
उपलब्ध करुन देण्याची योजना बंद करण्यात आली असून ती पुन्हा सुरु करण्यासंदर्भात केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

हज 2018 साठी राज्यभरातून 43 हजार 779 अर्ज प्राप्त झाले आहे. यापैकी 1 हजार 939 जागा 70 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांकरिता आणि 16 महिला करिता जागा राखीव ठेवण्यात आले. उर्वरित 41 हजार 824 यात्रेकरुमधून संगणकीय सोडतीद्वारे सुमारे 9 हजार यात्रेकरुची निवड आज करण्यात आली. 

यावेळी इम्तियाज काझी यांनी मान्यवरांचे पुस्तक देऊन स्वागत केले. अल्पसंख्याक विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे, सहसचिव तडवी, केंद्र हज समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. ए. खान, कार्यकारी
अधिकारी इम्तियाज काझी, वक्फ बोर्डचे चेअरमन एम. एम. शेख, कक्ष अधिकारी फारूक पठाण आदी यावेळी उपस्थित होते. 
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget