मनोरा आमदार निवास 1 फेब्रुवारीपासून रिकामे करणार

उच्चाधिकार समितीत निर्णय

मुंबई ( ९ जानेवारी ) : मनोरा आमदार निवास येथे नवीन आमदार निवासाची इमारत बांधण्यासाठी सध्याची इमारत पाडण्यात येणार आहे. त्यासाठी येत्या 1 फेब्रुवारीपासून मनोरा आमदार निवासातील कक्ष रिकामे करण्याचा निर्णय आज झालेल्या मनोरा आमदार निवास पुनर्बांधणी उच्चाधिकार समितीच्या बैठकित घेण्यात आला.

मनोरा आमदार निवास पुनर्बांधणीसंदर्भात उच्चाधिकार समितीची बैठक समिती प्रमुख व विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे,
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट, मुख्य सचिव सुमित मलिक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंह, विधिमंडळाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. 

मनोरा आमदार निवासाच्या पुनर्बांधणी नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कार्पोरेशनच्या (एनबीसीसी) मार्फत करण्यात येणार आहे. पुनर्बांधणीसाठी पर्यावरण विषयक व इतर विविध परवान्यांसाठी सार्वजनिक
बांधकाम विभागाने एनबीसीसीला सहकार्य करावे व लवकरात लवकर परवाने मिळवून द्यावेत, असे यावेळी समितीच्या वतीने निर्देश देण्यात आले. तसेच बांधकाम लवकर सुरू करण्यासाठी 1 फेब्रुवारीपासून आमदार निवासातील कक्ष रिकामे करावेत व तेथील वीज व पाणी पुरवठा खंडित करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले. 

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मनोरा आमदार निवासाच्या पुनर्बांधणीचे काम कमी कालावधीत व्हावे, यासाठी वेगाने प्रक्रिया कराव्यात. तसेच या बांधकामासाठी जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. 
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget