महापालिकेद्वारे दोन दिवसात ७९५ उपहारगृहांची तपासणी

१२ उपहारगृहे 'सील', १३५ ठिकाणी तोडकामासह ३१९ सिलिंडर्स जप्त

सर्व २४ विभागांमध्ये ५२ चमूंद्वारे धडक कारवाई सुरु

मुंबई ( ११ जानेवारी ) : बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील उपहारगृहांच्या तपासणी मोहिमेदरम्यान गेल्या दोन दिवसांत ७९५ उपहारगृहांची तपासणी करण्यात आली. या तपासणी दरम्यान मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आलेल्या १२ उपहारगृहांवर अग्निसुरक्षा विषयक कायद्यातील कलम ८ नुसार 'सील' करण्याची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये 'एम पूर्व' विभागातील ४, 'जी दक्षिण' व'एच पश्चिम' विभागात प्रत्येकी तीन आणि 'बी' व 'एन' विभागात प्रत्येकी १; याप्रमाणे १२ उपहारगृहांचा समावेश आहे. या मोहिमेदरम्यान १३५ ठिकाणी आढळून आलेली अनधिकृत बांधकामे तात्काळ तोडण्यात आली आहेत. या व्यतिरिक्त ४३८ उपहारगृहांना तपासणी अहवाल (Inspection Report) देऊन आवश्यक त्या सुधारणा तातडीने करवून घेण्याबाबत बजावण्यात आले आहे. तसेच ३१९ गॅस सिलिंडर्स देखील या तपासणी मोहीमेदरम्यान जप्त करण्यात आले आहेत.

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील उपहारगृहांमधील अनियमिततांची तपासणी करण्याचे काम महापालिकेने व्यापक स्तरावर सुरु केले आहे. या अंतर्गत सर्व २४ विभागांमध्ये मिळून ५२ चमूंद्वारे ही तपासणी सुरु आहे. या प्रत्येक चमूमध्ये मुंबई अग्निशमन दल, सार्वजनिक आरोग्य खाते आणि इमारत व कारखाने खाते या तिन्ही खात्यांमधील प्रत्येकी एक अधिकारी व आवश्यकतेनुसार संबंधित कर्मचारी यांचा समावेश आहे.

या तपासणी दरम्यान उपहारगृहातील अग्निसुरक्षा विषयक बाबी नियमांनुसार असल्याची तपासणी अग्निशमन दलाद्वारे तर आरोग्य विषयक बाबींची तपासणी सार्वजनिक आरोग्य खात्यातील अधिका-यांद्वारे करण्यात येते. तसेच इमारतीमधील बांधकाम विषयक बाबी, प्रवेशद्वार, मोकळी जागा इत्यादींची तपासणी इमारत व कारखाने या खात्यातील अधिकारी / कर्मचा-यांद्वारे करण्यात येत आहे.

वरीलनुसार ५२ चमूंद्वारे एकत्रितपणे संयुक्त पाहणी करण्यात येत आहे. यादरम्यान काही प्रमाणात अनियिमितता आढळल्यास त्याबाबत महापालिकेच्या संबंधित नियम व पद्धतीनुसार नोटीस देऊन निर्धारित कालावधी दरम्यान अपेक्षित बाबींची पूर्तता करण्याचे आदेशित केले जात आहे. त्याचबरोबर तपासणी दरम्यान अनधिकृत बांधकामे आढळल्यास किंवा दरवाजे बंद करण्यात आल्याचे आढळल्यास तात्काळ तोडक कारवाई केली जात आहे. तसेच मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्यास सदर आस्थापना तात्काळ सील करण्यात येत आहे.

वरीलनुसार महापालिकेद्वारे करण्यात आलेल्या कारवाईचा संक्षिप्त तपशील खालीलप्रमाणे आहे:

परि.


विभाग
तपासणी संख्या
आय.आर.दिले
सील केले
तोडकाम कारवाई
सिलिंडर जप्त
महत्त्वाच्या उपहारगृहे आस्थापनांची नावे


एक
88
49
0
17
29
---
बी
18
11
1
0
10
जाफरभाई दिल्ली दरबार
सी
24
6
0
4
12
दुर्गाआयर्विनकृष्णाराजमहालआल्फ्रेड,ऑर्टेक्सअन्नदाता आहार केंद्र
डी
43
34
0
8
42
रघुवंशी भोजनालयखेतेश्वर भोजनालयनिसर्ग,फाईव्ह स्पाईसला व्हेग्गीशारदाप्रमोद
21
16
0
5
0
सागरअलेक्झांडरमारवामुनलाईटसाईपॅलेस,केडीदोन
एफ /दक्षिण
24
0
0
0
7
भारत इंडज्ञस्ट्रीज
एफ /उत्तर
26
25
0
0
8
शारदा भवनदुर्गा लंच होमहॉट ऍण्ड स्पाईस,त्रिलोकस्वागतगार्मीशरॉयलस्टोनप्रीतम
जी /दक्षिण
16
16
3
0
0
जाफरान तोडीहोपीपोळावूडसाईडकिचनस्क्वेअर,कॅफेझूलेडीबागाव्हेवरपॉटग्रॅण्ड मामाव्हेर्बाना,ब्ल्यू वॉटरफाटीबाव
जी /उत्तर
36
29
0
5
15
लक्ष्मीलीनातंदूरगोल्डनअपनाशगुन,मिलनवेलकम

तीन
एच /पूर्व
52
17
0
22
5
रिजन्सीएअरव्ह्यूएमआयजी क्रीकेट क्लब,अमेयसिद्धीविनायक बेकरीचायनीजवनरवी व्हेजमहेशफॅगहरे कृष्णा
एच /पश्चिम
34
10
3
0
0
टॅबड्रॉपसोशलअबील ऍरोमामुगल तडका,ओमशिवमअली यांचे शाकाहारी उपहारगृहबॉम्बे रस्ताहोप्पीपोळा
के पूर्व
24
16
0
12
12
गार्डनप्रकाश गेस्टहाऊसशिवसागरमनमंदीर फरसाणविश्वास फरसाणफेमस

चार
के /पश्चिम
17
0
0
1
0
कोर्टयार्डस्लाईस ऑफ लाईमअरबन तडका
पी /दक्षिण
13
10
0
0
5
कोळी किचनडॉमिनोज पिझ्झासन्मानरत्ना,ग्रीन्ससबकुछ
पी /उत्तर
129
39
0
39
112
सुरभी स्वीटरश्मी स्वीट्सफेमस वडापाव

पाच

एल
46
46
0
1
12
जमजम हॉटेलगोल्डनमरबादेशमुख पंजाबन्यू इंडियारहेमीशबनमश्रीसमर्थपी.एन., आनंद फरसाण मार्ट
एम /पूर्व
24
6
4
0
6
नारायण डेअरीआर.केडेअरीगरीब नवाज,अनीस पोल्ट्रीबिसमिल्ला स्वीट मार्टप्रमीला
एम /पश्चिम
25
28
0
16
17
---

सहा
एन
28
14
1
0
3
नयकारन्यू चायना टाऊननीलयोगजस्सी,चंद्रलेखागुरुकृपाअचीजामोर्बीवाला स्वीट्स,राजस्थान भोजनालययादर मिल्क सेंटर


एस

33
12
0
0
0

अनंतहायको मॉलकर्मा
टी
21
18
0
4
0

वूडलँडउमा पॅलेसस्पाईस लेनपूजाप्रशांत,संदीप लंच होमअपूर्वावैशालीआजादरुची,बावर्चीफिरंगी फ्लेव्हर


सात

आर /दक्षिण

12
11
0
0
0

---
आर /मध्य
23
16
0
0
19

केणीकिनाराकॅफे कॉफी डेग्रीन चॅनलअंकल मार्टीनसनातन विहारस्पाईससिम्प्ली सारस्वत,गोडबोलेनिलमशिवमबे व्ह्यू

आर /उत्तर
18
18
0
1
5

फिसीयाबॉक्स 8, मीटर डाऊनपायलगोल्डन प्लेटगणेश बेकरीकोकण स्वादकृष्णा व्हेज


एकूण
795
447
12
135
319

Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget