ॲड. सुलेखा कुंभारे यांनी मुख्यमंत्र्यांची घेतली भेट ; भीमा कोरेगावबाबत दिली माहिती

मुंबई ( ५ जानेवारी ) : केंद्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्या ॲड. सुलेखा कुंभारे यांनी आज रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. ॲड. कुंभारे यांनी पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव आणि वढू येथे 4 जानेवारीला प्रत्यक्ष भेट देऊन स्थानिक नागरिक व पोलीस अधिकारी यांच्याकडून माहिती घेतल्याचे मुख्यमंत्र्यांना सांगितले. स्थानिकांच्या मागण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना अवगत केले.

त्यांनी मुख्यत्वे भीमा कोरेगाव विजयी स्तंभाला वंदन करण्यासाठी लाखो भाविक दरवर्षी असल्याने सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, भीमा कोरेगाव घटनेतील दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. यावर मुख्यमंत्री यांनी सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे सांगितले.

भीमा कोरेगाव घटनेसंदर्भात मिलींद सुर्वे यांच्या शिष्टमंडळाने आज रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पोलीस विभागाकडून आंदोलनकांची सुरू असलेली धरपकड थांबवावी तसेच त्यांच्यावर दाखल करण्यात येणारे गुन्हे मागे घ्यावे अशी मागणी केली. यावर मुख्यमंत्र्यांनी योग्य तो निर्णय घेणार असल्याचे सांगितले. शिष्टमंडळात अशोक तांबे, रत्नाताई मोहोड, शशिकांत शिंदे, सुमेंध सुर्वे, आनंद कडाळे, लक्ष्मीअम्मा देवेंद्र, हसनभाई शेख आदींचा समावेश होता.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget