डहाणूजवळच्या दुर्घटनेप्रकरणी मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त

मुंबई ( १३ जानेवारी ) : डहाणूजवळच्या समुद्र किनाऱ्यावर विद्यार्थ्यांची बोट उलटून झालेल्या दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दु:ख व्यक्त केले असून संबंधित यंत्रणेला मदत कार्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच मुंबई जवळच्या किनारपट्टीवर हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणीही मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त केला आहे.

डहाणू जवळच्या पारनाका समुद्र किनाऱ्यालगत डहाणूच्या के.एल. पोंडा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना नेणारी बोट उलटून आज सकाळी झालेल्या अपघातात काही विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, तर उर्वरित विद्यार्थ्यांना वाचविण्यात यश आले आहे. स्थानिक पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणेकडून शोधमोहीम सुरु असून विशेष बचाव पथके घटनास्थळी तैनात करण्यात आली आहेत. तटरक्षक दलाचेही पथक मदत कार्यात सहभागी झाले आहेत. या दुर्घटनेतील बाधित विद्यार्थ्यांना कुटिर रुग्णालय तसेच खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृत विद्यार्थ्यांच्या परिवारावर कोसळलेल्या दु:खात आम्ही सहभागी आहोत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. यासोबतच मुंबईजवळच्या किनारपट्टीवर ओएनजीसीचे हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणीही मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त केला असून या अपघातातील मृत अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाप्रती सहवेदना व्यक्त केल्या आहेत.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget