आजपासून ३४ 'अग्निसुरक्षा पालन कक्ष' कार्यान्वित

मुंबई ( १६ जानेवारी ) : ''आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना अधिनियम २००६'' ची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करण्याच्या दृष्टीने महापालिका क्षेत्रातील अग्निशमन केंद्रनिहाय 'अग्निसुरक्षा पालन कक्ष' स्थापन करण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार सर्व अग्निशमन केंद्रांवर प्रत्येकी एक, याप्रमाणे एकूण ३४ 'अग्निसुरक्षा पालन कक्ष'आजपासून कार्यान्वित करण्यात आले आहे. या प्रत्येक कक्षामध्ये मुंबई अग्निशमन दलातील अनुभवी व सक्षम अधिका-यांची 'नामनिर्देशित अधिकारी' (अग्निसुरक्षा पालन अधिकारी) या पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी महापालिकेच्या विभाग कार्यालयातील पद निर्देशित अधिका-यांशी समन्वय साधून महापालिका क्षेत्रातील इमारती,आस्थापना, सिनेमागृह, नाट्यगृह, मॉल्स, तळघर, गोडाऊन, रुग्णालये, नर्सिंग होम इत्यादींची अग्निसुरक्षेच्या दृष्टीकोनातून नियमितपणे तपासणी करुन अग्निसुरक्षा विषयक अटींची पूर्तता योग्य प्रकारे होत असल्याची खातरजमा करावयाची आहे.

आजपासून कार्यान्वित करण्यात आलेल्या सर्व ३४ अग्निसुरक्षा पालन कक्षातील नाम निर्देशित अधिका-यांची एक विशेष बैठक मुंबई अग्निशमन दलाच्या भायखळा येथील मुख्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकी दरम्यान उपस्थितांशी संवाद साधताना मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख अधिकारी प्रभात रहांगदळे यांनी ही माहिती दिली. या बैठकी दरम्यान रहांगदळे यांनी सर्व नवनियुक्त नामनिर्देशित अधिका-यांना त्यांनी पार पाडावयाची कर्तव्ये व जबाबदा-या इत्यादींची सविस्तर माहिती दिली. तसेच अग्निसुरक्षेच्यादृष्टीने ज्या बाबी करणे आवश्यक आहे, त्याची परिपूर्तता संबंधितांकडून करवून घेणे, परिपूर्तता होत नसल्यास त्याबाबत दंडात्मक कारवाई करणे याची देखील माहिती नामनिर्देशित अधिका-यांना बैठकीत देण्यात आली.

दरम्यान आस्थापना / उपहारगृहांच्या तपासणी मोहिमेदरम्यान गेल्या दोन दिवसात ६१९ उपहारगृहांची /आस्थापनांची तपासणी करण्यात आली. या तपासणी दरम्यान मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आलेल्या ३ उपहारगृहे / आस्थापना यांच्यावर अग्निसुरक्षा विषयक कायद्यातील कलम ८ नुसार 'सील' करण्याची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये 'बी' विभागातील अंबिका स्वीट्स, जी उत्तर विभागातील मे. राजेंद्र पिल्लई फरसाण मार्ट आणि के पूर्व विभागातील बेटर होम; याप्रमाणे एकूण ३ आस्थापना सील करण्यात आल्या आहेत. या मोहिमेदरम्यान ४९ ठिकाणी आढळून आलेली अनधिकृत बांधकामे तात्काळ तोडण्यात आली आहेत. या व्यतिरिक्त ३६९ उपहारगृहांना तपासणी अहवाल (Inspection Report) देऊन आवश्यक त्या सुधारणा तातडीने करवून घेण्याबाबत बजावण्यात आले आहे. तसेच २७५ गॅस सिलिंडर्स देखील या तपासणी मोहीमेदरम्यान जप्त करण्यात आले आहेत.

वरीलनुसार महापालिकेद्वारे करण्यात आलेल्या कार्यवाहीचा संक्षिप्त तपशील खालीलप्रमाणे आहे:
परि.विभाग
तपासणी संख्या
आय.आर.दिले
सील केले
तोडक कारवाई
सिलिंडर जप्त
तपासणी केलेली उपहारगृहे /आस्थापना


एक
20
5
0
5
7
छाया आर्याशैलेंद्र मित्तलडिजे.मर्चंट एन्टरप्रायजेझजोश उमामी बार व रेस्टॉरंट
बी
9
4
1
0
15
सत्कारजयहिंदअंबिका स्वीट्स(स्वयंपाकघर सील)
सी
24
12
0
4
16
लकीशालीमारसलमानआशिर्वाद,आयडिअल स्वीट मार्टलक्ष्मी मिल्क,विनय हेल्थ होमहुसेन बेकरी
डी
107
76
0
27
39
रॅने बारदिलबरक्रिस्टलश्रीकृष्ण हिंदू हॉटेलशिवसागरपॅन इंडियन,पंजाब सिंधब्रीजवासीकल्पनाश्रीराम हॉटेल व रत्ननिधी ट्रस्ट मेस
13
10
0
3
3
संजय फरसाणदोन
एफ /दक्षिण
18
6
0
0
9
वर्षी दरबार फास्ट फूडगणेश फरसाणपोदार कीड्स कॅन्टीन,अयंगार बेकरीनॅशनल टीनागोरी मिल्क सेंटर
एफ /उत्तर
23
23
0
0
0
रहमतअलीअल कादरीयादवसोना बिर्याणीन्यू मद्रास लंच होमईश्वर गेस्ट हाऊसशुभम हॉटेलज्योती,श्रीकृष्णउत्सव,
जी /दक्षिण
7
7
0
0
0
स्मॅशकमला मिल कंपाऊंड

जी /उत्तर
16
8
1
1
14
पूमबकेरतेरेसारॉयलसुशेगाद गोमंतक, 'एम राजेंद्र पिल्लई फरसाण मार्टयेथील भट्टी सील.

तीन
एच /पूर्व
8
2
0
0
18
वर्धे कॅटरर्सश्रीकृपा वडापावडॉमिनोज पिझ्झाअन्नपूर्णा स्वीट्सउजाला
एच /पश्चिम
21
14
0
0
3
मेओरॉन्टोखानाखजानाअमरदीप,केटल ऍण्ड केगटेस्ट ऑफ पंजाब बांद्रा
के /पूर्व
94
35
1
0
6
बेटर होम (सील), चायना गेटश्रीनगर हॉटेलसाईधामविजय पंजाब

चार
के /पश्चिम
33
22
0
0
23
कुबे लोखंडवालाअंधेरी रिक्रेएशन क्लब
पी /दक्षिण
17
9
0
1
7
दिल्ली टिफीन सर्व्हीसहेल्थ मॅडट,प्रफूल्ल टिफीनप्रफूल्ल फास्ट फूड,जयलीला कॉर्पेारेशन लिमीटेडगीता रिफ्रेशमेंटकिरन फास्ट फूड
पी /उत्तर
42
20
0
0
28
सेव्हन टु इलेव्हनमँगोजडेग्गी वेग्गीजगदंबाअंकल कीटनहंग्री डकएवन केटरर्स

पाच

एल
43
28
0
0
11
मिनारगरीब नवाजकृष्णारॉयल दरबारनागोरीसुजाता हॉटेलकृष्णा फास्ट फूडमंगल डेअरीबनारसी डेअरी
एम /पूर्व
11
6
0
0
13
एकनाथयुपीशुभमकॅफे इंडिया हॉटेलमल्हार लॉनशहनाई हॉल
एम /पश्चिम
4
6
0
1
0
ज्वेल ऑफ चेंबूर हॉटेल
सहा
एन
33
20
0
0
15
शाहीसन्मानविपूल स्वीट्सआलम बेकरीसागर फूडहॉटेल गुरुकृपा,पॅव्हेलियनगजराशीव डेअरीउजाला बेकरी

एस

33
13
0
0
16
शाही रेस्टॉरंटसागरसुर्याअलबेला,आशानिकम टी शॉप,
टी
8
6
0
6
0
व्ही.एसडाईनउमासाकीरॉयल ट्रीट

सात

आर /दक्षिण

7
7
0
0
0
---
आर /मध्य
19
14
0
0
12
स्पाईस रिपब्लिक ग्रीनस्पईस रिपब्लिक व्हेजवृंदाद्वारका,राधाकृष्णटॉप स्टारकुकू
आर /उत्तर
9
16
0
0
20
रामकृष्णदेसी तडकाचायनीज दरबारश्रीनाथ वडापावबाप्पा सीताराम पावभाजी सेंटरबाप्पा सीताराम फरसाण मार्ट

एकूण
619
369
3
48
275


Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget