'जी दक्षिण', 'एन' व 'इ' विभागात महापालिकेची धडक कारवाई

मुंबई, दि. 1 : बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील उपाहरगृहे, हॉटेल्स इत्यादींमधील अनधिकृत / बेकायदेशीर बाबींची तपासणी करण्यात येत आहे. या तपासणी दरम्यान आढळून आलेल्या अनियमिततांवर कारवाई देखील करण्यात येत आहे. याबाबत महापालिकेच्या 'इ', 'एन' व 'जी दक्षिण' या तीन विभागांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार आज तिन्ही विभागात १३४ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. यापैकी ५३ ठिकाणी निष्कासनाची कारवाई करण्यात आली. तर 'इ' विभागातील नायर मार्गावर 'शोले हुक्का पार्लर'वर धडक कारवाई करण्यात येऊन ५० हुक्का व संबंधित साहित्य तात्काळ जप्त करण्यात आले आहे.

आजच्या कारवाई दरम्यान 'इ' विभागात ४७ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. यापैकी २० ठिकाणी तोडकाम कारवाई करण्यात आली. यामध्ये जमजम हॉटेल व किंग कबाब या उपहारगृहांचा समावेश आहे. याच कारवाई दरम्यान विनापरवानगी साठा केलेले २३ सिलिंडर जप्त करण्यात आले.

'जी दक्षिण' विभागात ४१ आस्थापनांची तपासणी करण्यात येऊन अनियमितता आढळलेल्या १५ ठिकाणी निष्कासन कारवाई करण्यात आली. यामध्ये रघुवंशी मिल मधील शिशा रेस्टॉरंट वर कारवाई करण्यात आली. याच विभागातून १० सिलिंडर देखील जप्त करण्यात आले. तर 'एन' विभागात ४६ ठिकाणी तपासणी करण्यात आली. त्यापैकी १८ ठिकाणी कारवाई करण्यात आली. तसेच १८ सिलिंडर देखील जप्त करण्यात आले आहेत.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget