महापौर आयोजित ‘माझी मुंबई’ बालचित्रकला स्पर्धा

मुंबई ( ८ जानेवारी ) : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापौर आयोजित जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती उत्सवानिमित्त ‘बाल चित्रकला स्पर्धा’ रविवार, दिनांक १४ जानेवारी, २०१८ रोजी सकाळी ८.३० ते ११.३० दरम्यान बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील उद्यान व मैदानांत आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व भाषिक महापालिका प्राथमिक, माध्यमिक, खासगी अनुदानित, विना अनुदानित शाळांतील चित्रकलेची आवड असणाऱया इयत्ता १ ली ते १० वी च्या जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मुंबईचे महापौर प्रिं.विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी केले आहे.

स्पर्धेचे गट व विषयः-

गट क्रमांक १  इयत्ता १ ली ते २ री
१. माझी मुंबई

२. माझा आवडता खाऊ

३. माझे आवडते खेळणे


गट क्रमांक २  इयत्ता ३ री ते ५ वीः
१. मुंबईतील जत्रा

२. आम्‍ही गणपती बनवतो

३. मुंबईच्‍या समुद्राची सफर


गट क्रमांक ३  इयत्ता ६ वी ते ८ वीः
१. मुंबईतील गणेशोत्‍सव

२. मुंबईतील संध्‍याकाळ

३. माझ्या स्‍वप्‍नातील मुंबई


गट क्रमांक ४  इयत्ता ९ वी ते १० वीः
१. मुंबईची जीवनशैली

२. मुंबईची  लाईफ लाईन

३. माझी सुरक्षित मुंबई


  सदर स्पर्धेकरिता पुढील उद्यान व मैदाने निश्चित करण्यात आली आहेत. त्याची यादी पुढीलप्रमाणे आहेः-

           विभाग  हर्निमल सर्कल, बी विभाग  सीताराम मिल, शेनॉय मैदान; सी विभाग  स. का. पाटील उद्यान, डी विभागऑगस्ट क्रांती मैदान,  विभाग  वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान (राणीबाग), भायखळा (पूर्व);

एफ/दक्षिण विभाग  कामगार मैदान, परळ; एफ/उत्तर विभाग  पाच उद्यान अ, पाच उद्यान ब, पाच उद्यान क, जी/दक्षिण विभाग  संत ज्ञानेश्‍वर उद्यान, दादर , श्रमिक जिमखाना; ना.म.जोशी  मार्ग  जी/उत्तर विभाग  महापौर निवास शिवाजी पार्क
एच/पूर्व विभाग  एम. आय. जी. क्रिकेट क्लब, वांद्रे (पूर्व); एच/पश्चिम विभाग   कमला रहेजा उद्यान (राजेश खन्ना उद्यान), रोटरी , गजधर पार्कजवळ; के/पूर्व विभाग  छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल, पंपहाऊस व वास्तू इमारतजवळ, अंधेरी (पूर्व); शहीद विजय साळसकर उद्यान जोगेश्‍वरी – विक्रोळी लिंक रोडअंधेरी (पूर्व) के/पश्चिम विभाग  अंधेरी क्रीडा संकुल, अंधेरी (पश्चिम);

पी/दक्षिण विभाग  प्रबोधनकार ठाकरे मैदान, आरे कॉलनी महापालिका शाळा मैदान; पी/उत्तर विभाग  स्वामी विवेकानंद क्रीडांगण, नवजीवन शाळेजवळ, राणीसती मार्ग, मालाड (पूर्व); चाचा नेहरु क्रीडांगण लिबर्टी गार्डन, मालाड (पश्चिम) आणि आण्णा सावंत मनोरंजन उद्यान, मार्वे रोडमालाड (पश्चिम); प्रि‍यदर्शिनी इंदिरा गांधी उद्यानपारेखनगरमालाड (पूर्व) आर/दक्षिण विभाग बजाज रोड मराठी शाळा मैदान, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, समता नगर; चारकोप महापालिका शाळा मैदान, सेक्टर  १, चारकोप; आर/मध्य विभाग  वीर सावरकर उद्यान, आर/उत्तर विभाग  जरीमरी उद्यान, सी. एस. मार्ग, दहिसर (पूर्व)

एल विभाग  जय जवान, जय किसान उद्यान, नेहरुनगर उद्यान, एम/पूर्व विभाग देवनार कॉलनी गार्डन, आर. सी. एफ कॉलनी गार्डन, एम/पश्चिम विभाग  लोकमान्य टिळक मैदान, आचार्य उद्यान, चेंबूर;

 ‘एन विभाग  गुरु गोविंदसिंग मैदान, घाटकोपर (पूर्व); रहेजा उद्यान, लालबहादूर शास्त्री मार्ग, पेट्रोल पंपासमोर, घाटकोपर (पश्चिम); एस विभाग  डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, प्रबोधनकार ठाकरे मनोरंजन उद्यान; टी विभाग  डॉ. चिंतामणराव देशमुख उद्यान, मुलुंड (पूर्व); लाला तुळशीराम उद्यान, मुलुंड (पश्चिम); सरदार प्रतापसिंग उद्यान, मुलुंड (पश्चिम).   
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget