सलग दुसऱ्या दिवशी ३५७ ठिकाणी महापालिकेची कारवाई, तर ३० ठिकाणी 'सील'

मुंबई, दि. 31 बृहमुंबई महापालिका क्षेत्रातील उपाहारगृहे, हॉटेल्स, बार, मॉल्स इत्यादीतील अनियमिततांवर आज सलग दुसऱ्या दिवशीही धडक कारवाई सुरु होती. आजच्या कारवाई दरम्यान तपासणी करण्यात आलेल्या ६१६ ठिकाणांपैकी अनियमितता आढळून आलेल्या ३५७ ठिकाणी तोडकाम कारवाई करण्यात आली आहे. तर मोठ्या प्रमाणात अनियमितता असलेल्या ३० ठिकाणी सदर उपहारगृह किंवा त्याचा काही भाग सील करण्यात आला आहे. यामध्ये 'एल' विभागात २२ ठिकाणी, एस व आर उत्तर मध्ये प्रत्येकी ३ आणि 'डी'विभागात एक, याप्रमाणे ३० ठिकाणांचा समावेश आहे. त्याचबरोबर ४२६ सिलिंडर देखील आजच्या कारवाई दरम्यान जप्त करण्यात आले आहेत.

'इ' विभागात शिवदास चापली मार्गावर बेनामी हुक्का पार्लर कार्यरत होते. त्यात तब्बल ६० हुक्का व साहित्य जप्त करण्यात आले. त्याचबरोबर अग्निसुरक्षेच्या दृष्टीने अडथळा ठरू शकतील अश्या बाबी मोठ्या प्रमाणात तोडण्यात आल्या आहेत. तर अग्निसुरक्षेच्या दृष्टीने प्रतिकूल ठरणारे नियमबाह्य साहित्य, शेगड्या इत्यादी जप्त करण्यात आल्या आहेत.
बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील उपाहरगृहे, हॉटेल्स इत्यादींमधील अनधिकृत / बेकायदेशीर बाबींची तपासणी करण्याचे व त्यानुसार कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी सर्व २४ विभागांच्या सहाय्यक आयुक्तांना काल यापूर्वीच दिले होते. त्यानुसार काल दिनांक ३० डिसेंबर २०१७ च्या सकाळपासून महापालिका क्षेत्रात सर्वत्र कारवाई सुरु करण्यात आली आहे. कालच्या कार्यवाही दरम्यान ६२४ ठिकाणी तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी अनधिकृत वाढीव बांधकामे अथवा अनियमितता आढळून आलेल्या ३१४ ठिकाणी कारवाई करण्यात आली होती. तर ७ उपहारगृहे सील करण्यात आली होती.त्याचबरोबर ४१७ पेक्षा अधिक सिलेंडर देखील काल जप्त करण्यात आले होते.

आज रविवार हा सुटीचा दिवस असूनही सर्व संबंधितांना कामावर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते.त्यानुसार कालच्या प्रमाणेच आजच्या कारवाईसाठीही सर्व २४ विभागांमध्ये प्रत्येकी ३ चमू तयार करण्यात आल्या होत्या. या चमूंमध्ये इमारत व कारखाने, अतिक्रमण निर्मूलन, सार्वजनिक आरोग्य खाते यासारख्या संबंधित खात्यातील कामगार-कर्मचारी-अधिकारी यांचा समावेश होता. आजच्या कारवाई दरम्यान देखीलसंबंधित सहाय्यक आयुक्त, उपायुक्त व अतिरिक्त महापालिका आयुक्त घटनास्थळी उपस्थित राहून पर्यवेक्षकीय काम करित होते. तसेच अग्निशमन दलाचे अधिकारी व कर्मचारीही कार्यरत होते. यानुसार महापालिकेचे सुमारे १ हजार कामगार-कर्मचारी-अधिकारी आज कार्यरत होते. आजच्या कारवाई दरम्यान जेसीबी, बुलडोझर, अतिक्रमण निर्मूलन वाहने, ट्रक आणि गॅस कटर या सारखे साहित्य देखील मोठ्या प्रमाणात वापरण्यात आले.
कालच्या प्रमाणे आजही महापालिकेचे तिन्ही अतिरिक्त आयुक्त तोडक कारवाई सुरु असलेल्या ठिकाणी स्वत: उपस्थित होते. यामध्ये अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) आय. ए. कुंदन, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) विजय सिंघल, अतिरिक्त आयुक्त (शहर) आबासाहेब ज-हाड यांचा समावेश आहे.

वरील तपशीलानुसार आज सकाळपासून महापालिकेच्या सर्व विभागांमध्ये सुरु करण्यात आलेल्या कारवाईचा विभागनिहाय व परिमंडळनिहाय संक्षिप्त तपशिल पुढीलप्रमाणे आहे:

परि.
विभाग
तपासणी संख्या
कारवाई संख्या
सिलिंडर जप्त
उपहारगृहे हॉटेल पैकी महत्त्वाची नावेएक
१०
महेश लंच होम
हॉटेल डिलक्स
टेस्ट ऑफ केरळ
हॉटेल प्रताप इत्यादी
बी
७२
४३
अनधिकृत बाबींवर कारवाई करण्यात आली

सी
१२
११
ऑर्टेक्स
दिल्ली दरबार
पंचरत्न
ललित बार
पूनम
दोन उपाहारगृहांमध्ये हुक्का साहित्य जप्त करण्यात आले


डी
कॅफे सुमातिसरा मजला सील


५२
४२
४८
समुद्र हॉटेल
बॉम्बए इंटरनॅशनल
शिवदास छापली मार्गावर बेनामी हुक्का पार्लर मधील ६० हुक्का व साहित्य जप्तदोन


दोन
एफ /दक्षिण
२७
२५
४१
गोखले सोसायटी खानावळ
सत्यम भोजनालय
कैलास स्वीट
ग्रे प्रिमायसेस
आमंत्रण इत्यादी

एफ /उत्तर
१३
मिनी पंजाब
रामी इंटरनॅशनल
मिनी महाल बार इत्यादी
जी /दक्षिण
२६
कमला मिल मधील स्मॅश परिसर
रघुवंशी मिल मधील शिक्षा लाउंजरूफटॉप वेल्स स्पॅन
कराओस इत्यादी
जी /उत्तर
२९
१२
संसारधारावी
चायना बिस्त्रोदादर
चायना टाऊन
द स्टेटस रेस्टॉरंट इत्यादी


तीन
एच /पूर्व
अनधिकृत बाबींवर कारवाई करण्यात आली

एच /पश्चिम
३८
३०
२५
मेजबान हॉटेल
कॉर्नर हाऊस
थाई स्पा
आयरिश हॉटेल
ऑटर्स क्लब
बांद्रा जिमखाना
खार जिमखाना
वेलिंग्टन जिमखाना इत्यादी
के /पूर्व

३३
१६
हॉटेल हयातविमानतळ मार्ग (९०० स्केफुबांधकाम तोडले)
द्वारका स्नॅक्स (१५०० स्केफुबांधकाम तोडले)
हॉटेल शिवलीला
हबीबी हॉटेल अँड हुक्का पार्लर इत्यादी


चार
के /पश्चिम
४६
२९
२५
इस्टेला कॅफे
कॅफे प्लॅटर
कोयला
मॅड मॅक्स इत्यादी
१६ हॉटेल्स मध्ये काही साहित्य जप्त करण्यात आले
पी /दक्षिण
१०
लकी हॉटेल
शांघाय बार
चक्र बार
क्लासिक कोफोर्ट हॉटेल इत्यादी
पी /उत्तर

१०
११
हॉटेल रिसॉर्ट मढ
हॉटेल अकसा
सॉलिटेयरलिंक रोड
साई दर्या ढाबा
हॉटेल कोकोपाममार्वे इत्यादी
पाचपाच

एल

६४
४६
४३
२२ उपाहारगृहे किंवा त्यांचा भाग सील करण्यात आलायामध्ये के.जीएनकेटरर्सफैय्याज केटरर्स
एम /पूर्व
२५
२९
खानाखजाना
मिरॅकल बार
अनोखा बार इत्यादी
एम /पश्चिम
१८
१४
हॉटेल योगी
बार स्टॉक एक्सचेंजचेंबूर
ऑरेंज मिंट ओम साई हॉस्पिटॅलिटी येथे 'सीलकारवाई
सहा


एन

२५
१८
१८
पॉप्युलर फूड ट्रांक
हॉटेल शिवकृपा
ग्रीन विले
माय फेव्हरेत्तो इत्यादी
एस
२२
२२
तीन उपाहारगृहांमध्ये 'सीलकरण्याची कारवाई
मित्र ढाबा
अनंत हॉटेल इत्यादी
टी
३२
१२
२२
साई चायनीज फास्ट फूड
हॉटेल निसर्ग इत्यादी

सात
आर /दक्षिण
१९
१६
३१
शिवम सुंदरम इत्यादी

आर /मध्य
१४
१४
२०
अराउंड द ग्लोब
चस्का
एक्झॉटिक
सेंटर पॉईंट इत्यादी
आर /उत्तर
१२
१२
-

Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget