मुंबईमध्ये एलईडी लाईटद्वारे मासेमारी करणारी बोट जप्त

मुंबई ( ११ जानेवारी ) : एलईडी लाईटच्या सहाय्याने होणाऱ्या मासेमारीला आळा घालण्यासाठी मुंबई (शहर व उपनगर), रायगड व रत्नागिरी जिल्ह्यात मस्य व्यवसाय विभागाकडून विशेष पथके स्थापन करण्यात आली आहेत. मुंबई (शहर व उपनगर) जिल्हा अंमलबजावणी पथकाने केलेल्या कारवाईत एलईडी लाईट साधनसामुग्री असलेली एक मासेमारी बोट जप्त करण्यात आली असल्याची माहिती विभागाने दिली आहे.

एलईडी लाईटद्वारे करण्यात येणारी मासेमारी ही मत्स्य साठ्यावर अत्यंत घातक परिणाम करणारी आहे. केंद्र शासनाच्या 10 नोव्हेंबर 2017 च्या आदेशानुसार एलईडी लाईटद्वारे मासेमारी करण्यावर प्रतिबंध घालण्यात आला आहे. एलईडी लाईटच्या प्रकाशामुळे मासेमारी क्षेत्रातील सर्व मासे आकर्षित होऊन एकाच ठिकाणी जमा होतात. हा संपूर्ण साठा एकाच जाळ्याद्वारे पकडला जातो. त्यामुळे असे साठे संपत गेल्यास भविष्यात माशांचे उत्पादन कमी होऊन मत्स्य दुष्काळाला सामोरे जावे लागू शकते.

आज सहआयुक्त मत्स्यव्यवसाय (सागरी) राजेंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई (शहर व उपनगर) जिल्ह्यातील अंमलबजावणी पथकाने केलेल्या कारवाईत ससून डॉक बंदरासमोर ‘खंडोबा साई’ क्रमांक आएनडी. एमएच-1 एमएच-77 या नौकेवर एलईडी साधनसामुग्री आढळून आली. यामुळे ही नौका जप्त
करण्यात आली. महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियमांतर्गत नौकेला देण्यात आलेला परवाना रद्द करण्याचे आदेश ससून डॉकच्या परवाना अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget