(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); काळा घोडा फेस्टीव्हलचे आकर्षण ‘चरखा’ | मराठी १ नंबर बातम्या
" />

काळा घोडा फेस्टीव्हलचे आकर्षण ‘चरखा’

मुंबई ( ३ फेब्रुवारी ) : राज्यात प्रसिद्ध असणाऱ्या काळा घोडा फेस्टीव्हलची सुरुवात मोठ्या उत्साहात झाली असून त्या फेस्टीव्हलमध्ये विविध प्रकारच्या कलांचे आणि साहित्यांचे प्रदर्शन मांडण्यात आले आहे. 3 ते 11 फेब्रुवारी दरम्यान चालणाऱ्या प्रदर्शनात शासनाच्या ‘सहभाग’ या सामाजिक दायित्व कक्षाने स्टॉल उभारला आहे. यामध्ये खादी ग्रामोद्योगच्या माध्यमातून मांडलेला चरखा हे मुंबईकरांचे पहिल्या दिवसाचे आकर्षण ठरले.

‘सहभाग’ च्या माध्यमातून बांबू संशोधन प्रशिक्षण संस्थेने तयार केलेल्या विविध बांबूच्या वस्तू मांडण्यात आल्या. तसेच महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मखदूल अली महिला बचत गट व अदिवासी महिला आणि मुलांनी तयार केलेल्या गृह सजावटीच्या विविध वस्तू सहभागच्या स्टॉलवर विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या आहेत. या सर्वच वस्तूंना मुंबईकरांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाच्या ‘कल्पवृक्ष’ या संकल्पनेला तरुणाईकडून विशेष प्रोत्साहन मिळत आहे. कल्पवृक्षासोबत घेतलेली सेल्फी मुंबईकर मोठ्या उत्साहात फेसबूक आणि ट्विटरच्या माध्यमातून शेअर करत आहेत. मुकेश धानप यांनी केलेले वारली लाईव्ह पेंटींगही या फेस्टीव्हलमध्ये आकर्षण आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget