ठाणे ( १० फेब्रुवारी ) : बॅंक ऑफ महाराष्ट्र रायगड-ठाणे क्षेत्राने नुकताच बॅंकेचा 83 वा वर्धापन दिन चैतन्य दिन म्हणून मोठया थाटात साजरा केला. या प्रसंगी बॅंकेचे ठाणे क्षेत्राचे क्षेत्रीय प्रबंधक महेश महाबळेश्वरकर, उप महाप्रबंधक, सुनिता भोसले, सहाय्यक प्रबंधक, राजेंद्र बोरसे, गिरीश भांगी, प्रशांत गजभिये व जी.व्ही. अय्यर मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी क्षेत्रीय प्रबंधक महेश महाबळेश्वरकर यांनी सर्व प्रथम बॅंकेच्या 83 व्या वर्धापन दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. महाबळेश्वरकर म्हणाले की, बॅंकेची 83 वर्षाची यशस्वी परंपरा राहिली कारण की, बॅंकेने आपल्या ग्राहकांना व्यक्तिगत जिव्हाळयाचे प्रॉडक्ट दिलं. त्यामुळे ग्राहकांनी भरभरुन प्रेम देऊन बॅंकेवर विश्वास दर्शविला व हयाच ग्राहकांच्या प्रेमापोटी आपल्याला बॅंकेची पुढील वाटचाल दैदिप्यमान करण्याची जबाबदारी आपल्यावर ग्राहकांनी टाकली आहे. पुढे महाबळेश्वरकर म्हणाले की, व्यक्ती म्हणून 83 वर्ष हे जरी वयोमान जास्त असल तरी संस्था म्हणून बॅंक 83 व्या तारुण्यात प्रदार्पण करीत आहे ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. या प्रसंगी त्यांनी ग्राहकांच्या आर्थिक गरजा ओळखून त्यांना रिटेल ऋण देऊन आर्थिक गरज भागविण्याचे आवाहन केले. त्यांनी या प्रसंगी बॅंक भारत भरात चैतन्य दिन साजरा करीत आहे ही खरोखर चैतन्याची बाब असून सर्वांनी बॅंकेच्या उज्वल कामगिरीसाठी चैतन्य टिकवून ठेवण्याचे आवाहन केले.
या प्रसंगी बॅंकेने चैतन्य दिना निमीत्त कर्मचा-यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते यात जितेंद्र मेंघानी, कुमार पुष्कर, प्रतिमा जाधव, चंदन कुमार, श्रीकांत मांजरेकर, मिश्रा यांनी गीत, डुमनी मुरमुर, शुवली यांनी नृत्य, भवरे, पुनम भारते, निधी शर्मा यांनी कविता, गोविंद पापनोई, साधना जोशी यांनी कथा, भगत यांनी बासरी वादन व सौ. वर्षा सोहनी यांनी आगळी वेगळी कलाकृती प्रस्तुत केली तर अरविंद मोरे यांनी सामाजिक बॅंकींग या विषयावर वादविवाद मध्ये सहभाग घेतला. सहभागी कर्मच-यांना आपल्या उत्कृष्ट कलाकृतींची प्रस्तुती केल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
या प्रसंगी ठाणे क्षेत्रातील वेगवेगळया क्षेत्रात शाखांनी चांगली कामगिरी केल्याबद्दल शाखा प्रबंधक, चारोटी नाका, कोपरी, शहापूर, पाचपाखडी, वर्तक नगर, नालासोपारा, डोंबिवली पश्चिम, घोड बंदर, टी.एम.सी. नारपोली, भिवंडी, नायगांव, वाशी, नेरुल टाऊन शिप, शिवाजी चौक, कल्याण, नवली, वृदांवन, पडघा, तिळक नगर, डोबिवली, टिटवाला, नवीन पनवेल, नौपाडा, आर.ए.ई. बेलापूर, ठाकुर्ली, भिवंडी, बोरलीपंचतन, उलवे, एैरोली, कौसा व पालघर शाखांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बॅंकेचे उप क्षेत्रीय प्रबंधक, मा. गिरीश भांगी यांनी केले तर सुत्रसंचालन, विपणन सदस्य अरविंद मोरे व आभार प्रदर्शन उप क्षेत्रीय प्रबंधक राजेंद्र बोरसे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यश्स्विते करीता जितेंद्र मेंघानी, सौ. अंजली ओक, कुमार पुष्कर, गिता सॅलियन, व्ही. रंजन, शैलजा चाकवते, योगेश मोरे, मंगेश भालेराव, गोपिनाथ पानझडे, गणेश जोशी आदींनी अथक परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा