सोलापूर विद्यापीठाचा नामविस्तार ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ’ - विनोद तावडे

मुंबई ( १९ मे २०१८ ) : सोलापूर विद्यापीठाचा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ’ असा नामविस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 31 मे 2018 रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त विद्यापीठात नामविस्तार सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली.

मंत्रालयात आज शिवा संघटनेच्यावतीने वीरशैव लिंगायत समाजाचे प्रतिनिधी आणि धनगर समाजाचे प्रतिनिधीसमवेत समाजाच्या मागण्यांसंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तावडे बोलत होते.

या बैठकीस धनगर समाज विकासपरिषदेचे अध्यक्ष गणेश हाके, राष्ट्रीय समाज पक्षाचे महासचिव बाळासाहेब दोडतले, यशवंत उद्योजकचे अध्यक्ष ललित बंडगर, शिवा महिला आघाडीच्या अध्यक्ष वैशाली लाठे, शिवा संघटनेचे अध्यक्ष शिवा बिराजदार आदिसह समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी दोन्ही समाजाच्या प्रतिनिधींनी सामंजस्याने समाजाच्या हिताचा निर्णय घेतल्याने तावडे यांनी त्यांचे अभिनंदन केले. विद्यापीठाच्या नामविस्तारासाठी मंत्रीमंडळाच्या निर्णयानुसार उपसमिती स्थापन करण्यात आली होती. त्यानुसार सोलापूर विद्यापीठाच्या नामविस्ताराचा निर्णय घेण्यात आला असल्याचे तावडे यांनी यावेळी सांगितले. तसेच, सोलापूर विमानतळास महात्मा बसवेश्वर विमानतळ असे नाव देण्याचा निर्णय आणि सोलापूर रेल्वे स्टेशनला श्री सिद्धेश्वर रेल्वे टर्मिनस असे नाव देण्याबाबतचा प्रस्ताव राज्य शासन रेल्वे प्रशासनास पाठविणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.

सोलापूर येथे महात्मा बसवेश्वर यांच्या भव्य राष्ट्रीय स्मारकाची घोषणा झाली असून, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून पुढील कार्यवाहीबाबत अंमलबजावणी करण्यात येईल. याचबरोबर वीरशैव लिंगायत समाजातील तरूण तरूणींना उद्योग सुरू करण्यासाठी महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून महामंडळास दरवर्षी 10 कोटी रूपये देणे. अभ्यासक्रमामध्ये महात्मा बसवेश्वर यांच्या माहितीचा समावेश करणे, विविध विद्यापीठात महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्र स्थापन करण्यात यावे जेणेकरून तेथे महात्मा बसवेश्वर यांची माहिती देणारे व्याख्यान आयोजित करण्यात येतील. महात्मा बसवेश्वर जयंतीला महात्मा बसवेश्वर सामाजिक समता- शिवा पुरस्कार व्यक्ती व संस्था यांना विशेष कार्यासाठी देण्यात यावा. असे निर्णय घेण्यात आले असल्याची माहितीही तावडे यांनी यावेळी दिली. 
महाराष्ट्र वीरशैव- लिंगायत बोर्ड कायद्याने स्थापन करण्याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्यात येईल असेही तावडे यांनी सांगितले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget