कर्णबधीर विद्यार्थ्यांना जोडारी, तारतंत्री, सुतारकामाचे प्रशिक्षण

मुंबई ( १९ मे २०१८ ) : पुणे अपंग कल्याण आयुक्तालय तसेच ठाणे जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग यांच्या अधिनस्त असलेल्या शासकीय प्रौढ मूकबधीर प्रशिक्षण केंद्र गांधी रोड, उल्हासनगर-5, ठाणे, या संसथेत सन 2018-19 ह्या शैक्षणिक वर्षासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या धर्तीवर जोडारी (फिटर), तारतंत्री (वायरमन) व सुतारकाम (फर्नीचर मेकींग) या ट्रेडसाठी एक वर्ष कालावधीकरिता कर्णबधीर विद्यार्थ्यांना प्रवेश देणे सुरु आहे.

या प्रशिक्षणासाठी विद्यार्थी कर्णबधीर याच अपंग प्रवर्गातील असावा. शैक्षणिक पात्रता किमान इयत्ता 6 वी उत्तीर्ण व वय वर्ष 16 ते 25 या वयोगटातील असावा. प्रशिक्षण कालावधीत निवासाची, भोजनाची व शैक्षणिक साहित्याची विनामुल्य व्यवस्था करण्यात आली आहे.

प्रवेश अर्ज शासकीय प्रौढ मूकबधीर प्रशिक्षण केंद्र गांधी रोड, उल्हासनगर-5, जि. ठाणे या पत्यावर पोस्टाद्वारे अथवा प्रत्यक्ष कार्यालयात कार्यालयीन वेळ सकाळी 10 ते सायंकाळी 5.45 या कालावधीत सार्वजनिक सुट्या सोडून मिळतील.

अर्जासोबत 1) शाळा सोडल्याचा दाखला 2) मागील वर्षाचे गुणपत्रक (मार्कशीट) 3) सिव्हील सर्जन यांचा अपंगत्वाचा दाखला 4) श्रवणालेख 5) फोटो-4 इ. कागदपत्रांच्या मूळ प्रती व झेरॉक्स प्रति (2 संच) जोडावयाच्या आहेत. प्रवेश अर्ज स्विकारण्याची अंतीम तारीख 30 जुलै 2018 ही आहे. तथापि फक्त 50 जागा भरावयाच्या असल्यामुळे प्रथम येणाऱ्या व अटी शर्ती पुर्ण करणाऱ्यांना प्रथम प्राधान्याने प्रवेश दिला जाईल. संपर्क क्र.8999596590, 8551950248, 9421056954, 9594313179 या क्रमांकावर संपर्क साधावा असे अधीक्षक, शासकीय प्रौढ मूकबधीर प्रशिक्षण केंद्र, उल्हासनगर-421005 यांनी कळविले आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget