सहारनपुर ( ११ मे २०१८ ) : सहारनपुर मधील भीम आर्मी जिलाध्यक्ष कमल वालिया यांचे भाऊ सचिन वालिया यांचे 25 तासानंतर कडक बंदोबस्तात आज अंतिम संस्कार करण्यात आले. समर्थकांनी ''सचिन वालिया अमर रहे'' आणि ''जय भीम'' च्या घोषणा दिल्या. जवळजवळ पाच तास सहारनपुर-बड़गांव मार्गावर लोक बसून होते.
महाराणा प्रताप जयंती मध्ये कडक बंदोबस्तात बुधवारी रामनगर मध्ये भीम आर्मी जिलाध्यक्ष कमल वालिया यांचे छोटे बंधू सचिन वालिया यांची संशयास्पद परिस्थितीत गोळी लागल्याने मृत्यू झाला होता. कुटुंबांनी जयंती मध्ये सहभागी राजपूत समाजाचे चार युवकांवर हत्येचा आरोप ठेवला आहे.
घटनास्थळी डीएम, एसएसपी यांना आंदोलनकर्त्यांच्या विरोधाचा सामना करावा लागला. जिल्हा रुग्णालयात भीम आर्मी समर्थकांनी रात्रि उशिरा पर्यंत पोस्टमार्टम करु दिले नाही. ते केवळ चार आरोपीयांच्या अटकेची मागणी करत होते. त्यांचे म्हणणे होते की, आरोपींना अटक केल्यावरच पोस्टमार्टम करु दिले जाईल. दरम्यान, सचिन यांची आई कांति वालिया यांच्या तक्रारीवरून चार लोकांविरुद्ध एफआईआर दाखल करण्यात आलेला आहे.
तनाव परिस्थिति लक्षात घेता जिल्हयातील इंटरनेट सेवा बंद केली गेली आहे. संपूर्ण जिल्ह्यात सुरक्षा व्यवस्था कडक ठेवण्यात आलेली आहे.

टिप्पणी पोस्ट करा