(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); मुंबई पदवीधर व कोकण विभाग पदवीधर मतदानाच्या वेळेत बदल | मराठी १ नंबर बातम्या
" />

मुंबई पदवीधर व कोकण विभाग पदवीधर मतदानाच्या वेळेत बदल

नवी मुंबई ( १९ जून २०१८ ) : भारत निवडणूक आयोगाकडील दि.13 जून 2018 रोजीच्या अधिसूचनेच्या अनुषंगाने मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर व कोकण विभाग पदवीधर या तीन विधानपरिषद मतदार संघाची द्विवार्षिक निवडणूकीकरिता मतदानाची वेळे 2 तसांनी वाढविली आहे. सोमवार दि. 25 जून 2018 रोजी मतदान होणार असून मतदानाची वेळ सकाळी 7.00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत केली आहे. असे महेन्द्र वारभुवन, सहा. निवडणूक निर्णय अधिकारी, तथा उपायुक्त (सामान्य), कोकण विभाग यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

मतदानाचा हक्क बजावण्यासाठी
विशेष नैमित्तिक रजा
निवडणूकीसाठी मतदार असलेल्या पदवीधर/शिक्षक मतदारसंघातील मतदारांना निवडणूकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी त्या दिवसाची विशेष नैमित्तिक रजा देण्याबाबत राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या दि. 23 जून 2011 च्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने तरतूद करण्यात आलेली आहे, असे महेन्द्र वारभुवन, सहा. निवडणूक निर्णय अधिकारी, तथा उपायुक्त (सामान्य), कोकण विभाग यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget