नागपूर ( १२ जुलै २०१८ ) : हाफकीन इन्स्टिट्यूटमार्फत राज्यातील विविध दवाखान्यांना लागणारी औषधे एकत्रित खरेदी करण्याचा निर्णय झाला असून पुढील सहा महिन्यांत सर्व आरोग्य केंद्रांना औषधी पुरवठा केला जाईल, असेआरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी विधानपरिषदेत सांगितले.
विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी ग्रामीण भागात औषधांचा तुटवडा जाणवतो याबाबत हाफकीन इन्स्टिट्यूट औषधांची खरेदी कधी करणार असा प्रश्न विचारला होता. डॉ. सावंत म्हणाले, शासनाने 168 कोटींची औषधे खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून 149 पुरवठा आदेश निर्गमित केले आहेत. तसेच आवश्यकता वाटल्यास उपचारासाठी एकूण खरेदीच्या सहा टक्के एवढी औषधांची खरेदी करण्याचे अधिकार दवाखान्यांना दिलेले आहेत. यावेळी झालेल्या चर्चेत अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट, सदस्य जयंत पाटील यांनी सहभाग घेतला.

टिप्पणी पोस्ट करा