विधानपरिषद प्रश्नोत्तरे : मधुमेह, कर्करोग आजारावरील औषधांच्या किंमती कमी करण्यासाठी जीएसटी कौन्स‍िलकडे पाठपुरावा

नागपूर ( १२ जुलै २०१८ ) : मधुमेह, कर्करोग या आजारावरील औषधांच्या किंमती कमी करण्याच्या दृष्टीने जीएसटी कौन्स‍िलकडे पाठपुरावा सुरु असल्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानपरिषदेत सांगितले. सदस्य जनार्दन चांदुरकर यांनी मधुमेह, कर्करोग या आजारावरील औषधांच्या किंमती कमी करण्याबाबत केलेल्या कार्यवाहीबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.

त्यावर उत्तर देताना मुनगंटीवार म्हणाले, दुर्धर आजारावरील औषधांच्या किंमती कमी करण्यासाठी देशातील अनेक राज्यांनी जीएसटी कौन्स‍िलकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. सध्या अशा औषधांवर 12 टक्के जीएसटी आहे. राज्य शासनाने अशा औषधांवर 5 टक्के जीएसटी लावावा अशी मागणी केली आहे. गोर गरिबांना अशा आजारासाठी मोफत औषधे देण्याचा शासन विचार करीत असल्याचेही शेवटी त्यांनी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत वित्त व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर, सदस्य सर्वश्री प्रा. जोगेंद्र कवाडे, जगन्नाथ शिंदे, अनिकेत तटकरे, राहुल नार्वेकर, श्रीमती विद्या चव्हाण यांनी सहभाग घेतला.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget