(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); मल्होत्रा हाऊस येथील उपनिबंधक कार्यालय पर्यायी जागेत हलवू - सुभाष देशमुख | मराठी १ नंबर बातम्या
" />

मल्होत्रा हाऊस येथील उपनिबंधक कार्यालय पर्यायी जागेत हलवू - सुभाष देशमुख

नागपूर ( १३ जुलै २०१८ ) : मुंबईतील मल्होत्रा हाऊस येथील जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेची इमारत मोडकळीस आली आहे. शिवाय काही ठिकाणी पडझडही झाली आहे, दुर्घटना टाळण्यासाठी हे कार्यालय त्वरित पर्यायी जागेत हलविण्यात येईल, अशी माहिती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी विधानपरिषदेत दिली.

मल्होत्रा हाऊस येथील जिल्हा उपनिबंधकाची इमारत मोडकळीस आल्याबाबतची लक्षवेधी सूचना सदस्य ॲड. राहुल नार्वेकर यांनी मांडली होती, लक्षवेधीला उत्तर देताना देशमुख बोलत होते. ते म्हणाले, मल्होत्रा हाऊसला भेट देऊन इमारतीची पाहणी केली आहे. इमारत मालकाला दुरूस्तीबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार आहे, पर्यायी जागा शोधण्याचे काम सुरू आहे. कोणत्याही कर्मचाऱ्याच्या जिवीताला धोका निर्माण होणार नाही, याची दक्षता शासन घेत आहे. कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार त्या-त्या ठिकाणी कार्यालय हलविण्यात येईल, असेही त्यांनी एका उपप्रश्नाला उत्तर देताना सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य प्रवीण दरेकर यांनी यांनी सहभाग घेतला.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget