(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); मुंबईतील कोळीवाड्यांच्या सीमा निश्चित करण्याबाबत सहा महिन्यांत निर्णय - चंद्रकांत पाटील | मराठी १ नंबर बातम्या
" />

मुंबईतील कोळीवाड्यांच्या सीमा निश्चित करण्याबाबत सहा महिन्यांत निर्णय - चंद्रकांत पाटील

नागपूर ( १३ जुलै २०१८ ) : मुंबईतील कोळीवाडे, गावठाण आणि आदिवासी पाडे यांच्या सीमा निश्चित करण्याबाबत आणि पुनर्विकासासंबंधी सहा महिन्यात निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानपरिषदेत दिली.

सदस्य किरण पावसकर यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. पाटील म्हणाले, मुंबई शहर व मुंबई उपनगरातील कोळीवाड्यांचे प्रत्यक्ष सर्वेक्षण करुन सीमांकन करण्यासाठी अनुसरावी लागणारी कार्यपद्धती आणि त्यासंबंधीची मार्गदर्शक तत्वे निश्चित करण्यासाठी 20 नोव्हेंबर 2012च्या शासन निर्णयानुसार समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीने सन 2015 ते 17 दरम्यान जागेवर जाऊन काही कोळीवाड्यांची प्रत्यक्ष पाहणी करुन स्थळ पाहणीचा अहवाल दि. 2 मे 2016 व 1 जानेवारी 2018 च्या पत्रान्वये शासनास सादर केला आहे. त्या अनुषंगाने पुढील कार्यवाही करण्यात येत आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी पाडे व पात्र अतिक्रमणदारांचे पुनर्वसन करण्याबाबतचा प्रस्ताव संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे मुख्य वनसंरक्षक आणि संचालक यांनी शासनास सादर केला असून पुनर्वसनाचा प्रस्ताव पुढील उचित कार्यवाही करण्याकरिता झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाला अग्रेषित करण्यात आला असल्याचे पाटील यांनी सांगितले. या चर्चेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, सदस्य सर्वश्री प्रवीण दरेकर, निरंजन डावखरे, भाई जगताप यांनी सहभाग घेतला.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget