नागपूर ( १२ जुलै २०१८ ) : अतिरिक्त डिग्री बोगस असलेल्या 20 डॉक्टरांचे परवाने रद्द करुन त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी विधानपरिषदेत सांगितले. सदस्य अनंत गाडगीळ यांनी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या डॉक्टरांची अतिरिक्त डिग्री बोगस असल्याबाबत प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नाला उत्तर देताना महाजन म्हणाले, 53 डॉक्टरांच्या अतिरिक्त डिग्रीच्या प्रमाणपत्राबाबत चौकशी करण्याची कार्यवाही महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडून सुरु आहे. त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यावर पुढील कार्यवाही करण्यात येईल.
टिप्पणी पोस्ट करा