नागपूर ( १३ जुलै २०१८ ) : राज्यातील एकही पात्र शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार नाही, असे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या वेळी सांगितले.
जामखेड, जि.अहमदनगर येथील शेतकरी धोंडीराम शिरसाट यांना कर्जमाफीपासून वंचित राहावे लागल्याने केलेल्या आत्महत्येसंदर्भात सदस्य राधाकृष्ण विखे पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना देशमुख यांनी सांगितले. आधार कार्ड शिवाय कर्जमाफी अर्ज पोर्टलवर सादर करण्याची सुविधा शासनाने उपलब्ध करुन दिली होती. राज्यातील 2 लाख 40 हजार आधार कार्ड नसलेल्या शेतकऱ्यांनी आपले अर्ज दाखल केलेले आहेत. तथापि उपरोक्त प्रकरणात कर्ज माफीबाबत विशेष बाब म्हणून विचार केला जाईल तसेच या प्रकरणाची चौकशी करुन कोणी दोषी आढळल्यास कारवाई केली जाईल. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री गणपतराव देशमुख, डॉ. आशिष देशमुख, भास्करराव जाधव, आमदार काळे यांनी भाग घेतला.

टिप्पणी पोस्ट करा