(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); विधानपरिषद प्रश्नोत्तरे : माळशिरस (जि. सोलापूर) तालुक्यातील भूसंपादन झालेल्या शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला देण्याबाबतची कार्यवाही प्रगतीपथावर | मराठी १ नंबर बातम्या
" />

विधानपरिषद प्रश्नोत्तरे : माळशिरस (जि. सोलापूर) तालुक्यातील भूसंपादन झालेल्या शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला देण्याबाबतची कार्यवाही प्रगतीपथावर

नागपूर ( १३ जुलै २०१८ ) : माळशिरस (जि. सोलापूर) तालुक्यातील सातारा-लातूर राष्ट्रीय महामार्ग क्र. 548सी साठी भूसंपादन झालेल्या शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला देण्याबाबतची कार्यवाही प्रगतीपथावर असल्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांनी आज विधानपरिषदेत सांगितले.

सदस्य रामहरी रुपनवर यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पोटे-पाटील बोलत होते. पोटे-पाटील म्हणाले, सातारा-लातूर राष्ट्रीय महामार्ग क्र. 548 सी राष्ट्रीय महामार्ग केंद्र शासनाच्या दि. 3 जानेवारी 2017 च्या अधिसूचनेद्वारे घोषित झालेला असून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला देण्याबाबतची कार्यवाही प्रगतीपथावर आहे.

सद्य:स्थितीत राज्यमार्ग क्र. 141 ची रुंदी 24 मीटर आहे. या रुंदीतच व प्रत्यक्ष असलेल्या वहिवाटीच्या रुंदीतच दोन पदरी व पेव्हर शोल्डरचे काम प्रगतीत आहे. भौमितिक, वळण सुधारणा, बसबे, विश्रांती थांबा तसेच पथकर
नाका इ. करीता तेथे वहिवाटीच्या रुंदीपेक्षा जास्त रुंदीची आवश्यकता असून अशा ठिकाणी भूसंपादन करण्यात येणार असून 3 (A) ची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. भूसंपादनाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर रस्ता
सुधारणेचे काम करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांनी कळविले असल्याचेही पोटे-पाटील यांनी सांगितले. याबाबत सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी संबंधितांसमवेत बैठक घेण्याचे निर्देश राज्यमंत्र्यांना दिले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget