नागपूर ( १२ जुलै २०१८ ) : गेवराई पंचायत समिती अंतर्गत काही बनावट संस्थांनी नरेगामधून कामाचे देयके अदा करताना बोगस व बनावट पावत्या जोडून निधीमध्ये गैरव्यवहार केल्या प्रकरणी संबंधितांवर फौजदारी कारवाई
करण्याचे निर्देश दिल्याचे रोजगार हमी मंत्री जयकुमार रावल यांनी विधानपरिषदेत सांगितले.
बनावट संस्थांनी खोटी बिले देऊन पैशांचा गैरव्यवहार केल्या प्रकरणी सदस्य अमरसिंह पंडित यांनी प्रश्न विचारला होता. रावल यांनी सांगितले, या बनावट कंपन्यांना 74 लाख रुपये अदा करण्यात आले आहेत. या कंपन्या मान्यताप्राप्त नाहीत. त्यांनी जीएसटी आणि व्हॅट दोन्हीही भरलेला नाही. या कर कायद्यांनुसारही संबंधित बोगस कंपन्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा