(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); विधानपरिषद : सूर्या धरणाचा पाणीसाठा बिगर सिंचनासाठी आरक्षित - जलसंपदा मंत्री गिरीश महाजन | मराठी १ नंबर बातम्या
" />

विधानपरिषद : सूर्या धरणाचा पाणीसाठा बिगर सिंचनासाठी आरक्षित - जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

नागपूर ( १२ जुलै २०१८ ) : राज्याच्या जलनितीत पिण्याच्या पाण्यास प्रथम प्राधान्य असल्याने सूर्या धरणाचा पाणीसाठा बिगर सिंचनासाठी, विविध अभिकरणासाठी आरक्षित करण्यात आल्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी विधानपरिषदेत सांगितले.

सदस्य रवींद्र फाटक यांनी सूर्या धरणाचे पाणी असंख्य गावांचा विरोध असतानाही अन्यत्र वळविल्याबद्दल प्रश्न विचारला होता. महाजन म्हणाले, पूर्वी सूर्या धरणाच्या पाण्याचे सिंचन क्षेत्र 14 हजार हेक्टर होते. परंतु पिण्याच्या पाण्याला महत्व दिल्याने हेच सिंचन क्षेत्र आता आठ हजार हेक्टर झाले आहे. धरणाचे पाणी शेतीसाठी, औद्योगिकीकरणासाठी आणि पिण्यासाठी किती वापरायचे यासंदर्भात अभ्यास करण्यासाठी राज्यपाल यांच्या सूचनेनुसार विविध विभागांच्या सचिवांची एक संयुक्त समिती नेमण्याबाबत कार्यवाही करण्यात येत आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget