(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); विधानसभा कामकाज लक्षवेधी : लॉईड्स इस्टेट इमारतीला कुठलाही धोका नाही | मराठी १ नंबर बातम्या
" />

विधानसभा कामकाज लक्षवेधी : लॉईड्स इस्टेट इमारतीला कुठलाही धोका नाही

नागपूर ( १६ जुलै २०१८ ) : मुंबईतील ॲण्टॉप हिल येथील दुर्घटना प्रकरण न्यायप्रविष्ट असून या दुर्घटनेमुळे लॉईड्स इस्टेट इमारतीला कुठलाही धोका नाही. या दुर्घटनेच्या कारणांचा शोध आणि सभोवतालच्या इमारतींच्या स्थैर्यावरील परिणामांविषयी सर्वंकष अहवाल सादर करण्यासाठी उच्च न्यायालयाने भारतीय प्राद्योगिक संस्था (आयआयटी, मुंबई) ला नेमल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली.

सदस्य अबु आझमी यांनी याविषयी विचारलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना श्री.फडणवीस पुढे म्हणाले, ही दुघर्टना अत्यंत गंभीर आहे. हे संपूर्ण प्रकरण उच्च न्यायालय हाताळत आहे. कोर्ट कमिश्नर शांतीलाल जैन यांनी परिसराची पाहणी करुन दुर्घटनेचा लॉईड्स इस्टेट इमारतीच्या सुरक्षिततेवर कोणताही परिणाम झालेला नसून नागरिकांनी आपल्या घरांचा ताबा
घ्यावा असा अहवाल त्यांनी महापालिकेला दिला आहे त्यानुसार कार्यवाही सुरु आहे. ॲण्टॉप हिल येथील दोस्ती रियालिटीच्या विकासकाने 50 मजली इमारतीसाठी पाया खोदण्याचे काम केल्यामुळे लगतच्या लॉईड्स इमारतीच्या आवारातील जमीन खचल्याप्रकरणी दोस्ती रियालिटीच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर या दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी सुरु असताना राज्य सरकारला स्वतंत्र चौकशी करता येत नसली तरी लोकप्रतिनिधींच्या भावना उच्च न्यायालयाला अवगत केल्या जातील. तसेच भारतीय प्राद्योगिक संस्था, पवई, मुंबई यांच्या अहवालानुसार दोषींवर कारवाई केली जाईल. त्याच बरोबर इतर इमारतीच्या आजुबाजूचा भाग खचत असल्यास त्यावर नियंत्रणाच्या सूचना दिल्या जातील असेही फडणवीस यांनी सांगितले. यावेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, सदस्य सुनील प्रभू यांनी चर्चेत सहभाग घेतला.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget