(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); विधानसभा प्रश्नोत्तरे : जलजन्य आजारावर प्रतिबंध व नियंत्रणासाठी राज्य शासनाकडून विविध उपाययोजना | मराठी १ नंबर बातम्या
" />

विधानसभा प्रश्नोत्तरे : जलजन्य आजारावर प्रतिबंध व नियंत्रणासाठी राज्य शासनाकडून विविध उपाययोजना

नागपूर ( १२ जुलै २०१८ ) : राज्यातील सार्वजनिक आरोग्य प्रयोग शाळांमध्ये एप्रिल 2018 मध्ये 53 हजार 512 पाणी नमुन्यांची जैविक तपासणी करण्यात आली त्यापैकी केवळ नऊ टक्के दूषित पाणी आढळले. तसेच जलजन्य आजारावर प्रतिबंध व नियंत्रणासाठी राज्य शासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती पाणी पुरवठा व स्व्‍ाच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या वेळी दिली.

दूषित पाण्यामुळे पटकी, कावीळ, विषमज्वर असे जलजन्य आजार पसरल्यास या जलजन्य आजारावर प्रतिबंध व नियंत्रणासाठी पुढीलप्रमाणे उपाययोजना करण्यात येतात. यात जलजन्य आजाराचे नियमित सर्वेक्षण, जलजन्य आजारासाठी आरोग्य संस्थांना आवश्यक औषध पुरवठा, पाणी शुद्धीकरणासाठी जलसुरक्षकांचे नियमित प्रशिक्षण, ग्रामविकास व पाणी पुरवठा विभागाच्या समन्वयाने नियमित स्वच्छता सर्वेक्षण, जलजन्य आजार प्रतिबंधासाठी जनतेचे आरोग्य शिक्षण, शुद्धीकरण यंत्रणा, आर.ओ (RO) डीएफयू (DFU) आदी बसवून शुध्द पाणी पुरवठा करण्यात येतो, राज्यात पाणी नमुने तपासणीकरिता प्रयोगशाळांचे बळकटीकरण करण्यात येत आहे. जलसुरक्षकांना उद्दिष्टानुसार पाणी नमुने गोळा करण्याचे काम यशस्वी करण्यास प्रोत्साहन भत्ता देण्यात येतो, नळ पाणी पुरवठा योजना पूर्ण करण्याबाबत रास्यस्तरावरुन विशेष पाठपुरावा करण्यात येत आहे. यासंदर्भात सदस्य राहुल कुल यांनी प्रश्न विचारला होता. 
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget