(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); माता मृत्यूदर कमी करण्यात महाराष्ट्र देशात द्वितीय | मराठी १ नंबर बातम्या
" />

माता मृत्यूदर कमी करण्यात महाराष्ट्र देशात द्वितीय

नवी दिल्ली ( २९ जून २०१८ ) : माता मृत्यूदर कमी करण्यात महाराष्ट्राने देशभरात द्वितीय क्रमांक पटकावला असून या यशस्वी कामगिरीसाठी आज केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा यांच्या हस्ते महाराष्ट्राला पुरस्कार देऊन
गौरविण्यात आले. राज्याचे आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

येथील हयात हॉटेल मध्ये ‘माता मृत्यूदर’ कमी केल्याबद्दल आयोजित कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. माता मृत्यूदर कमी करण्यात केरळ राज्य देशात प्रथम आहे. महाराष्ट्राचा द्वितीय क्रमांक आहे, तर तिसऱ्या क्रमांकावर तामिळनाडू हे राज्य आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने भारताला वर्ष 2030 पर्यंत प्रत्येकी 1000 गर्भवती महिलेमागे 70 पर्यंत मृत्यूदर कमी करण्याचे लक्ष्य दिले होते. केरळ राज्याने हा दर 46 पर्यंत आणलेला आहे. महाराष्ट्र राज्याने हा दर 61
पर्यंत आणला असून तामिळनाडू मध्ये हा दर 68 आहे.

डॉ. सावंत पुरस्कार स्वीकारल्यानंतर दिलेल्या प्रतिक्रियेत म्हणाले, माता मृत्यूदरात महाराष्ट्र द्वितीय क्रमांकापर्यंत पोहोचल्याचे समाधान आहे. मात्र हा दर पुढील काही काळात आणखी कमी करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न राहील.

प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानामध्ये महाराष्ट्र प्रथम या अभियानांतर्गत असलेल्या संकेतस्थळावर खासगी तसेच सरकारी डॉक्टर यांची नावे नोंदवावी लागतात. या संकेतस्थळावर देशभरातील जवळपास पाच हजार डॉक्टरांनी नावे नोंदविली आहेत. त्यापैकी महाराष्ट्रातून सर्वाधिक 600 डॉक्टरांचा समावेश आहे. दर महिन्याच्या 9 तारखेला मातृत्व अभियानांतर्गत डॉक्टर आपल्या सेवा देतात. त्यासाठी महाराष्ट्राला पुरस्कृत करण्यात आले. हा पुरस्कार आरोग्य विभागाचे सचिव प्रदिप व्यास यांनी स्वीकारला. महाराष्ट्रात हे अभियान केंद्र शासनाने सुरू करण्याच्या पूर्वीपासून लागू केलेले होते. या अंतर्गत गर्भवती महिलांची सोनोग्राफी करण्यात येते. यासह ॲनिमियाग्रस्त गर्भवती महिलांना आयर्नचे इंजेक्शन दिले जाते. याचा सकारात्मक परिणाम महिलांच्या प्रसूती दरम्यान दिसून आलेला आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget