(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); डॉ. प्रशांत देशमुख, डॉ.सखाराम काळे व डॉ.सोमनाथ होळकर नेहरू पुरस्काराने सन्मानित | मराठी १ नंबर बातम्या
" />

डॉ. प्रशांत देशमुख, डॉ.सखाराम काळे व डॉ.सोमनाथ होळकर नेहरू पुरस्काराने सन्मानित

नवी दिल्ली ( १६ जुलै २०१८ ) : कृषी अभियांत्रिकी क्षेत्रात देशात सर्वोत्तम शोध प्रंबंधासाठी मुंबई येथील केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेचे वरिष्ठ संशोधक डॉ. प्रशांत देशमुख व डॉ.सखाराम काळे तर डॉ. सोमनाथ होळकर यांना पीक संरक्षण क्षेत्रात सर्वोत्तम शोध कार्यासाठी केंद्रीय कृषी तथा शेतकरी कल्याण मंत्री राधामोहन सिंह यांच्या हस्ते जवाहरलालनेहरू पुरस्काराने आज सन्मानीत करण्यात आले.

येथील पुसा परिसरात स्थित भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या ए.पी.शिंदे सभागृहात आज भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या ९० व्या स्थापना दिनानिमित्त आयोजितकार्यक्रमात कृषी क्षेत्रातील सर्वोत्तम शोध प्रबंधासाठी देशातील कृषी संशोधकांचा सन्मान करण्यात आला. केंद्रीय कृषी राज्य मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, भारतीय कृषी संशोधनपरिषदेचे सचिव तथा महासंचालक डॉ. त्रिलोचन महापात्रा यावेळी मंचावर उपस्थित होते.

कृषी क्षेत्रातील संशोधनासाठी यावेळी ९ विषयांसाठी देशातील एकूण १८ संशोधकांना ‘जवाहरलाल नेहरू सर्वोत्तम संशोधन पुरस्कार-२०१७’ प्रदान करण्यात आला.यावेळी कृषी अभियांत्रिकी क्षेत्रात ‘ सुपारीच्या
सालीपासून तंतू वेगळे करण्यासाठी यंत्र सामुग्रीचा विकास’ विषयावरील डॉ. प्रशांत देशमुख यांच्या संशोधनासाठी त्यांना सन्मानीतकरण्यात आले. ५० हजार रुपये, सुवर्णपदक आणि प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

डॉ देशमुख यांच्या संशोधनाविषयी

डॉ. देशमुख यांनी दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कृषी शक्ती व यंत्रे विभागात ‘सुपारीच्या सालीपासून तंतू वेगळे करण्यासाठी यंत्रसामुग्रीचा विकास’ विषयावरील शोध प्रबंध २०१६
मध्ये पूर्ण केला. डॉ. देशमुख यांनी २०१७ मध्ये हा प्रंबंध भारतीय कृषी संशोधन परिषदेकडे पाठविला व त्याची निवड सर्वोत्तमशोध प्रबंध म्हणून करण्यात आली. सुपारीच्या सालीच्या तंतूच्या गुणधर्मांचा अभ्यास व विविध परिक्षणानंतर कोकण कृषी विद्यापीठाद्वारे विकसीत करण्यात आलेल्या बिटरसाईजच्या यंत्राची माहिती या शोध प्रबंधात देण्यात आली आहे. सुपारीच्या सालीपासून तंतू वेगळे करण्यात प्रथमच यंत्र तयार झाले त्याचा मोठा फायदा सुपारी उत्पादक शेतक-यांना झाला. हे यंत्र शेतक-यांना हातळण्यास सोपे, वजनाने हलके, लहान आकाराचे असून त्याची किमंत १२ हजार ७०० रूपये आहे. कोकण कृषी विद्यापीठाच्या कृषी शक्ती वयंत्रे विभागाचे प्राध्यापक डॉ. शहारे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. देशमुख यांनी हा शोधप्रंबध पूर्ण केला आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget