नागपुर ( १८ जुलै २०१८ ) : मुंबईतील घाटकोपर परिसरात झालेल्या चार्टर्ड विमान दुर्घटनेची नागरी उड्डान विमान संचालनालय (डीजीसीए) मार्फत चौकशी सुरू आहे. या चौकशीचा अहवाल प्राप्त करून अहवालानुसार दोषी आढळल्यास विमान मालकाविरूध्द गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली.
सदस्य विजय वडेट्टीवार यांनी याविषयीची लक्षवेधी उपस्थित केली होती. त्याला उत्तर देताना फडणवीस बोलत होते. नाशिकमधील हिंदुस्थान एरोनॉटिकल लिमिटेडच्या विमान दुर्घटनेत ज्या द्राक्ष व डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे अशाना राज्य सरकार कडून मदत देण्यात येईल तसेच हिंदुस्थान एरोनॉटिकल लिमिटेड यांच्याकडूनही मदत मिळवून दिली जाईल असेही फडणवीस यांनी सदस्य छगन भुजबळ यांच्या प्रश्नावरील उत्तरात सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा