(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार – सन २०१७-१८ च्‍या शिक्षकांची नावे जाहिर | मराठी १ नंबर बातम्या
" />

आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार – सन २०१७-१८ च्‍या शिक्षकांची नावे जाहिर

मुंबई ( २१ ऑगस्ट २०१८ ) : भारताचे माजी राष्ट्रपती सर्वपल्ली डॉ.राधाकृष्णन यांचा दिनांक ०५ सप्टेंबर हा जन्मदिवस, .त्यांची स्मृती चिरंतन रहावी म्हणून ,या दिवशी “आदर्श शिक्षक महापौर पुरस्काराने“ शिक्षकांना सन्मानित करण्यात येते. आदर्श शिक्षक महापौर पुरस्‍कार सन २०१७- १८ च्‍या पुरस्‍कार प्राप्‍त शिक्षकांची नावे मुंबईचे महापौर प्रिं.विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी आज (दि.२१ ऑगस्‍ट २०१८) दुपारी महापालिका मुख्‍यालयात आयोजित एका प‍त्रकार परिषदेत जाहिर केली.

याप्रसंगी उप महापौर हेमांगी वरळीकर, सभागृह नेते विशाखा राऊत, स्‍थायी समिती अध्‍यक्ष यशवंत जाधव, शिक्षण समिती अध्‍यक्ष मंगेश सातमकर, उप आयुक्‍त (शिक्षण) मिलीन सावंत, शिक्षणाधिकारी महेश पालकर तसेच सबंधित महापालिका अधिकारी उपस्थित होते.

शिक्षण विभागातील महानगरपालिका प्राथमिक व माध्यमिक शाळा,खासगी अनुदानित व विनाअनुदानित प्राथमिक शाळांमधील जे शिक्षक ज्ञानदानाचे व विद्यार्थी घडविण्याचे पवित्र कार्य प्रामाणिकपणे करीत आहेत,त्यांचा यथोचित गौरव करण्याची परंपरा सन-१९७१ पासून ०२ शिक्षकांना पुरस्कृत करुन सुरु झाली.तदनंतर वेळोवेळी यामध्येबदल होऊन आजमितीस ५० आदर्श शिक्षकांना “महापौर पुरस्काराने ” गौरविण्यात येते. महानगरपालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळा,खासगी अनुदानित शाळा व विना अनुदानित प्राथमिक शाळांतील आदर्श आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सतत असिधाराव्रत स्विकारलेल्या ५० शिक्षकांना प्रत्येकी रु.१०,०००/- (ECS द्वारे ) ,बृहन्मुंबई महानगरपालिका मानचिन्हाचे सोन्याचा मुलामा दिलेले पदक , शाल व श्रीफळ देऊन महापौरांच्या हस्ते सन्मानित केले जाणार आहे.

दिनांक - ११.0८.२०१८ ,१३.०८.२०१८ व १६.०८.२०१८ या कालावधीत निवड समितीने सिटी ऑफ लॉस एंजालिस मनपा शाळा,माटुंगा ( पश्चिम ) येथे १०८ शिक्षकांच्या मुलाखती घेऊन त्यातून एकूण ५० शिक्षकांची महापौर पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. सन- २०१७-१८ च्या पुरस्कारासाठी आदर्श शिक्षकांची निवड करण्याकरिता मनपा प्राथमिक व माध्यमिक शाळा,खासगी अनुदानित शाळा व विनाअनुदानित शाळांतील एकूण – १०८ शिक्षकांच्या मुलाखती घेऊन त्यातून ५० आदर्श शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. सन-२०१७-१८ साठी पुरस्कार प्राप्त झालेले माध्ममनिहाय शिक्षकांच्‍या नावांची यादी सोबत जोडण्‍यात आली आहे.

महापौर पुरस्कार प्राप्त शिक्षक 2017-18

भारती रमेश यमगर मुख्या - मिठानगर मनपा उ.प्रा मराठी क्र. 2 - मनपा पी/ दक्षिण मराठी
सुवर्णा सुधीर कालेकर प्रशिक्षिका - जनाबाई आणि माधवराव रोकडे - मनपा मराठी शाळा मनपा बी मराठी
मंदा विश्वास वंडेकर प्रशिक्षिका - नवाब टँक उ.प्रा.मराठी शाळा - मनपा ई मराठी
प्रशांत मनोहर निजाई प्रशिक्षक - लॉर्ड हॅरिस उ.प्रा.मराठी शाळा - मनपा ए मराठी
आसावरी राजन नलावडे प्रशिक्षिका - माहिम कॉजवे मनपा लो.प्रा.मराठी शाळा - मनपा जी/ एन् मराठी
ऋतुजा रमेश मोरे प्रशिक्षिका - भरुचा रोड मनपा मराठी शाळा क्र.2 - मनपा आर/ उत्तर मराठी
दर्शना भूषण पाटील प्रशिक्षिका - चारकोप गांव - मनपा मराठी उ.प्रा.शाळा मनपा आर/ दक्षिण मराठी
राजकुमार बापू थोरात प्रशिक्षक - एम्.एच.बी - म.न.पा मराठी शाला क्र १ मनपा पी/ उत्तर मराठी
अमृता चंद्रकांत जोशी प्रशिक्षिका - हनुमान नगर मनपा मराठी शाळा मनपा आर/ दक्षिण मराठी
जयश्री सुभाष गवळी प्रशिक्षिका - नारीयलवाडी मनपा मराठी उ प्रा शाळा मनपा एच्/ पूर्व मराठी
उमिता राहुल गांधले प्रशिक्षिका - ओशिवरा मनपा मराठी शाळा क्र.2, मनपा के /पश्चिम मराठी
वृषाली सुरेश खाड्ये. प्रशिक्षका - पासपोली म.न.पा मराठी शाळा क्र.01 मनपा एस् मराठी
निवेदिता नितीन मानकामे प्रशिक्षिका - मुलुंड कँप म.न.पा मराठी शाळा क्र.02, मनपा टी मराठी
विदया गणेश आंबोकर. प्रशिक्षका - टागोरनगर म.न.पा उ.प्रा मराठी शाळा क्र.03 मनपा एस् मराठी
शाह साजिद अमीर शाह मुख्या. - शिवाजीनगर म.न.पा उर्दू शाळा क्र.02 मनपा एम् /पूर्व उर्दू
यास्मिन कौसर मोहम्मद ईसा मुख्या. - मेघराज सेठी मार्ग मनपा उर्दू शाळा भायखळा मनपा ई उर्दू
तौफिक अमीन मुल्ला प्रशिक्षक - काजुपाडा म.न.पा लो.प्रा. उर्दू शाळा मनपा एल् उर्दू
गौतम रामकुमार पाल मुख्या. - वरळीनाका उ.प्रा. हिंदी शाळा , वरळी मनपा जी/ दक्षिण हिंदी
लीलावती इंद्रबहादूर सिंह मुख्या. - न्यु सायन मनपा उ.प्रा .हिंदी क्र.२ मनपा एफ/उत्तर हिंदी
जितेंद्रकुमार श्रीनाथ तिवारी प्रशिक्षक - आकुर्ली रोड मनपा उ. प्रा. हिंदी शाळा,कांदीवली पूर्व मनपा आर/ एस हिन्दी
भारती संजीव श्रीवास्तव प्रशि.शि. - उन्नत नगर मनपा उ.प्रा. हिंदी शाळा, रोड नं.2 मनपा पी/ दक्षिण हिन्दी
वंदना योगेश चौबे प्रशिक्षिका - शताब्दि सोहळा, सहकार नगर म.न.पा हिंदी शाळा क्र. 01, मनपा एम्/ पश्चिम हिन्दी
शिवकुमार सूर्यपाल शर्मा प्रशिक्षक - गोवंडी म.न.पा.उ.प्रा.हिंदी शाला मनपा एम्/ पूर्व हिन्दी
सचिन श्याम सिंह मुख्या. - चिंचोली इंग्रजी एम.पी.एस शाळा . मनपा पी / नॉर्थ इंग्रजी
स्वाती चंद्रशेखर शिदोरे प्रशिक्षिका - अंधेरी प. मनपा इंग्रजी शाळा मनपा के / वेस्ट इंग्रजी
किर्तीदा मनिष त्रिवेदी प्रशिक्षिका - एक्सर तळेपाखाडी इंग्रजी शाळा बोरीवली (प.) मनपा आर / मध्य इंग्रजी
निती चंद्रमौली कैला प्रशिक्षिका - वरळी सी फेस मनपा उ.प्रा.इंग्रजी शाळा, मनपा जी/द इंग्रजी
विनायक जैतु खरे प्रशिक्षक - पवई म.न.पा इंग्रजी उ.प्रा शाळा मनपा एस् इंग्रजी
डॉ. जागृती असित तेरैया प्रशिक्षिका - हसनाबाद गुजराती म्युनि. शाळा, खार (प) मनपा एच् / वेस्ट गुजराती
पोरचेल्वी करुणानिधी मुख्या. - आरे कॉलनी उ.प्रा.मनपा तमिळ शाळा क्र.2 मनपा पी/एस् तमिळ
कट्टीमनी श्रीमंत शिवराय प्रशिक्षक - जरीमरी म.न.पा उ.प्रा. कन्नड शाळा मनपा एल् कन्नड
राजेश रामचंद्र अवघडे शा.शि. प्रशि. - क.दा.गायकवाड मराठी शाळा क्र १ मनपा एफ/उत्तर शा.शि.
दर्शना अनिल राऊत शा.शि . - पोयसर म न प हिंदी शाळा क्र.2, मनपा आर/मध्य शा.शि.
रिटाबेन अशोकभाई पटेल प्रशिक्षिका - लायन्स जुहू सेंटर मनपा विशेष मुलांची शाळा मनपा एच / वेस्ट मंदबुध्दी शाळा
मीरा सत्तू बोडके चित्रकला शिक्षिका - कुलाबा इंग्रजी मनपा उ.प्रा. शाळा मनपा ए चित्रकला
संदीप विठ्ठल जाधव कार्यानुभव - टागोरनगर म.न.पा उर्दू शाळा मनपा एस् कार्या.
छाया भानूदास साखरे संगीत शिक्षिका - समतानगर मनपा मराठी शाळा समता नगर, मनपा आर/ दक्षिण संगीत
विश्‍वनाथ बळीराम म्‍हात्रे सहा. शिक्षक - एल.के.वाघजी मनपा माध्‍य. शाळा, माध्यमिक एफ /उत्‍तर मराठी
प्राची प्रदीप जोशी सहा. शिक्षिका - शीव मनपा माध्‍य. शाळा माध्यमिक एफ/एन मराठी
लार्जी वर्गीस मुख्या. - सेंट मॅथ्युज प्रायमरी स्कुल ,आजमी नगर, गेट क्रं. 7 , मालवणी , मालाड (प) मुंबई विना अनुदानित पी /उत्तर इंग्रजी
सतीश रामचंद्र धुरत सहा. शिक्षक - उदयाचल प्राथ. शाळा पिरोजशा नगर, विक्रोळी, पूर्व, विना अनुदानित एन इंग्रजी
करुणा कृष्ण गज्जाला शिक्षिका - आय.ई.एस. न्यू इंग्लिश इंग्रजी प्राथमिक शाळा बांद्रा (iपूर्व) विना अनुदानित एच/पू इंग्रजी
परमेश्वरी वैकुंठ्म वीरबत्तीनी मुख्या. - मॉर्डन प्रायमरी स्कूल कुर्ला (प) कुर्ला (प) अनुदानित एल इंग्रजी
मनदीप कौर विर्दी. मुख्या. - श्री दशमेश पब्लिक स्कुल 131, मुलुंड कॉलनी , मुलुंड (प) अनुदानित टी इंग्रजी
गुरिंदर कौर जगजीत लांबा मुख्या. - सेठ आर.जे.जे. प्राथ. इंग्रजी शाळा डी.एन.डी. रोड सीएसटी मुंबई-01 अनुदानित ए इंग्रजी
शेखर सोपन धुमाळ मुख्या. - विद्या विकास सभा प्राथमिक विद्यालय बोरीवली (प) अनुदानित R/C मराठी
स्‍वरुप अनाजी सावंत सहाय्‍यक शिक्षिका - शिक्षण साधना मंडळाचे, साधना विद्यालय मराठी प्राथमिक विभाग, शीव, अनुदानित F/N मराठी
शोभना उदय हेगडे सहाय्‍यक शिक्षिका - IES पाटकर गुरूजी विद्यालय, 180, सरस्वती निलयम,हिंदु कॉलनी दादर अनुदानित F/N मराठी
शशिकला माधव खंदारे सहा. शिक्षिका - कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय प्रतिक्षानगर ,सायन अनुदानित F/N मराठी
प्रितीजा प्रकाश दळवी. सहाय्यक शिक्षिका - आय.इ.एस.हर्णे गुरूजी विद्यालय, वांद्रे(पूर्व) अनुदानित H/E मराठी
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget