नागपूर ( १८ जुलै २०१८ ) : राज्याचे अर्थ, नियोजन आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज सुयोग पत्रकार सहनिवासाला भेट देऊन पत्रकारांशी संवाद साधला. स्व. बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना लागू झाल्याबद्दल त्यांचा यावेळी गौरव करण्यात आला.
यावेळी झालेल्या अनौपचारिक चर्चेत मुनगंटीवार यांनी 13 कोटी वृक्षलागवड, व्याघ्र संरक्षण, वनसंवर्धन, राज्याचे अर्थकारण, जीएसटी आदी विविध विषयांवर पत्रकारांशी मनमोकळा संवाद साधला.
यावेळी झालेल्या अनौपचारिक चर्चेत मुनगंटीवार यांनी 13 कोटी वृक्षलागवड, व्याघ्र संरक्षण, वनसंवर्धन, राज्याचे अर्थकारण, जीएसटी आदी विविध विषयांवर पत्रकारांशी मनमोकळा संवाद साधला.
लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाच्या बळकटीकरणाच्या हेतूने पत्रकार बांधवांच्या सहकार्यासाठी शासन सदैव सकारात्मक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. वृक्षलागवड मोहिमेत यापूर्वी झालेल्या वृक्षारोपणाने वनक्षेत्रात वाढ झाल्याचे सर्वेक्षणात दिसून आले आहे. मोहिमेबाबत पारदर्शकतेसाठी जिओ टॅगिंगच्या सुविधेनंतर आता प्रत्येक झाडाची नोंद नागरिकांना तपासता येईल, असे तंत्रज्ञान विकसित करण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले. मुनगंटीवार यांच्या हस्ते यावेळी सुयोग सहनिवासाच्या आवारात वृक्षारोपणही करण्यात आले.
टिप्पणी पोस्ट करा