(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); सोलापूर येथे कृषी प्रदर्शन व महिला बचत गटास शासकीय दूध डेअरीची जागा मिळणार - पणन मंत्री सुभाष देशमुख | मराठी १ नंबर बातम्या
" />

सोलापूर येथे कृषी प्रदर्शन व महिला बचत गटास शासकीय दूध डेअरीची जागा मिळणार - पणन मंत्री सुभाष देशमुख

मुंबई ( २० ऑगस्ट २०१८ ) : सोलापूर जिल्हातील कृषी प्रदर्शन व महिला बचत गटाच्या विविध उत्पादनास सोलापूर येथील शासकीय दुध डेअरीची जागा मिळणार असून त्या ठिकाणी तातडीने संबंधिताने काम सुरु करावे, असे निर्देश सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी दिले.

याबाबत पदुम विभागाचे मंत्री महादेव जानकर यांच्या समवेत आज बैठक संपन्न झाली. या बैठकीस अतिरिक्त मुख्य सचिव विजय कुमार, दुग्धविकास आयुक्त राजीव जाधव तसेच संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

दुध संवर्धन विभागाने उपलब्ध करुन दिलेल्या या जागामुळे सोलापूर जिल्हातील महिला बचत गटाच्या विविध उत्पादनास मोठया प्रमाणात बाजार पेठ उपलब्ध होईल. तसेच कृषी प्रदर्शानामुळे जिल्हातील शेतकऱ्यांलाही त्याचा लाभ होईल. तसेच पंजाब राज्यामार्फत महिला बचत गटाच्या उत्पादनास पंजाबमध्ये बाजार पेठ मिळवून देण्याबाबत मदत केली जाणार असल्याची महिती देशमुख यांनी यावेळी दिली.

पणन व दुग्धविकास विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी याबाबत तातडीने कार्यवाही करुन सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी बांधव व महिला बचत गटातील भगिनींना लाभ होईल हे पाहावे. असे निर्देश पदुम मंत्री जानकर यांनी यावेळी दिले. या बैठकीस पणन महामंडळाचे उप महाव्यवस्थापक डी.डी. देशमुख, व मंत्रालयातील कक्ष अधिकारी नाईकवाडे व इतर अधिकारी उपस्थित होते.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget